IMPIMP

Pune Corporation | पुणे महापालिकेने थकबाकीदारांचे तब्बल 27 गाळे केले सील; आंबेगाव येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशनचे मैदानही घेतले ताब्यात

by nagesh
Pune PMC - Uruli Devachi - Fursungi | The demand to create an independent municipality or municipality excluding villages is 'political'! Pune PMC News Uruli Devachi - Fursungi Hadapsar & Wagholi

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Corporation | भाडेतत्वावर दिलेल्या मिळकतींची थकबाकी न भरल्याने महापालिकेने २७ गाळे सील केले असून आंबेगाव बुद्रुक (Ambegaon Budruk) येथील पुरंदर टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीचे (Purandar Technical Education Society) मैदानही ताब्यात घेतले आहे. २७ भाडेकरूंकडे तब्बल ३ कोटी २८ लाख रुपयांची थकबाकी आहे. (Pune Corporation)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शहराच्या विविध भागांमध्ये महापालिकेच्या मिळकती आहेत. यापैकी बहुतांश मिळकती या आर ७ अंतर्गत ताब्यात आल्या असून काही ठिकाणी महापालिकेने उभारलेल्या इमारतींमध्ये व्यावसायीक गाळेही काढले आहेत. या मिळकती व गाळे भाडेतत्वावर देण्यात येतात. मागील दोन वर्षांमध्ये उत्पन्न वाढीसाठी सरसावलेल्या महापालिकेने मिळकत कर विभागासह सर्वच विभागांमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले असून त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. याचाच भाग म्हणून महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने भाडेतत्वावर दिलेले गाळे अथवा वास्तुंची अद्ययावत यादी तयार केली असून करार झालेल्या परंतु तो संपुष्टात आलेल्या तसेच कराराशिवाय वापरण्यात येणार्‍या गाळे व वास्तुंचीही यादी तयार केली आहे. त्यानुसार करारांचे नुतनीकरण करणे अथवा त्या ताब्यात घेउन निविदा प्रक्रिया राबवून भाडेतत्वावर देण्यास गती आली आहे. (Pune Corporation)

 

 

यासोबतच थकबाकीदारांकडून वसुलीसाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, जे भाडेकरू थकबाकी भरण्यास टाळाटाळ करत आहेत, त्या वास्तु व गाळे सील करण्यात येत आहेत. नुकतेच महापालिकेने रविवार पेठेतील ३, टिळक रस्त्यावरील ढेरे उद्योग भवन येथील गाळा क्र. ५, वाकडेवाडी येथील गाळा क्र. २, घोरपडे पेठेतील प्रियंकाजी महिला उद्योग समुहाला दिलेले १३ गाळे, सावरकर भवन येथील सहा गाळे आणि येरवडा येथील हुले कॉम्प्लेक्समधील ३ गाळ्यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधीक थकबाकी ही टिळक रोडवरील ढेरे उद्योग भवनमधील प्रेमचंद बाफना यांना दिलेल्या गाळ्याची आहे. ती सुमारे १ कोटी ५ लाख रुपये असून पाठोपाठ सावरकर भवन येथील ६ गाळ्यांची एकूण थकबाकी ही १ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे, अशी माहिती मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आंबेगाव येथील मैदान पुरंदर टेक्नीकल एज्युकेशन सोसायटीला भाडेतत्वावर दिले होते. या संस्थेच्या विद्यार्थ्यांसाठी मैदानाचा वापर होत होता.
परंतू महापालिकेची मालकी असताना स्थानीक नागरिकांना मॉर्निंग वॉकसाठीही प्रतिबंध करण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती.
या परिसरात महापालिकेचे मैदानच नसल्याने स्थानीक नागरिकांनी येथे व्यायामाला परवानगी मिळावी तसेच स्थानीक मुलांनाही खेळण्यासाठी मैदान उपलब्ध व्हावे अशी मागणीही नागरिकांची होती. यावरून मागील दोन वर्षांपासून संस्था आणि स्थानीक नागरिकांमध्ये वाद सुरू होते. अखेर नुकतेच महापालिकेने हे मैदान ताब्यात घेतले, अशी माहिती प्रशासनातील अधिकार्‍यांनी दिली.

 

 

Web Title :- Pune Corporation | Pune Municipal Corporation seals 27 arrears; The grounds of Purandar Technical Education at Ambegaon were also seized

 

हे देखील वाचा :

MS Dhoni | ‘…म्हणून धोनीने घेतला कर्णधारपद सोडण्याचा निर्णय’; CSK च्या सीईओंनी सांगितली अंदर की बात

Nia Sharma Exercise Video | निया शर्माचा Exercise व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा हदरताल, परफेक्ट फिगरसाठी करावं लागतंय ‘हे’ काम..

Jitendra Awhad | पुणेकरांसाठी मोठी गुडन्यूज ! धानोरी येथे म्हाडाचा नवा प्रकल्प उभारणार – मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती

 

Related Posts