IMPIMP

Pune Crime | पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून 21 किलो गांजा जप्त, एकाला अटक

by nagesh
Pune Crime | 21 kg cannabis seized from Pune Police Crime Branch Anti-Narcotics Cell, one arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे पोलिसांच्या (Pune Police) अंमली पदार्थ विरोधी पथक (Anti Narcotics Cell, Pune) दोनच्या पोलिसांनी 4 लाख 35 हजार रुपये किमतीच्या गांज्यासह एकाला अटक (Arrest) केली आहे. त्यांच्याकडून 21 किलो 675 ग्रॅम गांजा (Marijuana) जप्त केला आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) कोलवडी (केसनंद) गावातील गायकवाड वस्ती येथे केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आंबु दशरथ पवार Anbu Dashrath Pawar (वय-40 रा. मु.पो. अंतरवाली, ता. भुम, जि. उस्मानाबाद -Osmanabad, सध्या रा. कोलवडी, गायकवाड वस्ती, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपींवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक चेतन दिलीप गायकवाड (Chetan Dilip Gaikwad) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

 

अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर व पोलीस अंमलदार हे लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत असताना कोलवडी गावातील गायकवाड वस्ती येथे एका व्यक्तीकडे गांजा असून तो गांजाची वाहतुक करीत असल्याची माहिती मिळाली.
पथकाने परिसरात सापळा रचून एका सिल्वहर रंगाच्या ज्युपीटर (एमएच 14 जेडब्ल्यू 3828) गाडीवर एक नायलॉन पोते घेऊन येताना आंबु पवार दिसला. त्याची झडती घेतली असता 4 लाख 35 हजार रुपये किमतीचा 21 किलो 675 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ आढळून आला.
आरोपीकडून गांजा आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 4 लाख 85 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे -2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर
(Police Inspector Prakash Khandekar),
पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण (PSI Digambar Chavan),
पोलीस अंमलदार संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, मयुर सुर्यवंशी, चेतन गायकवाड,
संतोष जाचक, संदिप शेळके, साहिल शेख, आझीम शेख, योगेश मांढरे, महिला अंमलदार दिशा खेवलकर यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : Pune Crime | 21 kg cannabis seized from Pune Police Crime Branch Anti-Narcotics Cell, one arrested

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘द काश्मिर फाईल्स’ ! अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिल्यानंतर भाजप आमदारांनी धरला थेट बाहेरचा रस्ता ?

IND vs PAK | मोठा अनर्थ टळला ! भारतीय क्षेपणास्त्र कोसळल्यानंतर पाकिस्तानही क्षेपणास्त्र डागणार होता, पण…

Pune Crime | ‘फ्लॅट आम्हाला विक नाहीतर तुझे हातपाय तोडू’, महिलेला धमकावणाऱ्या पती-पत्नीवर FIR

 

Related Posts