IMPIMP

Pune Crime | पोलीस शिपायाचा परस्पर कारनामा; लोहमार्ग उपअधीक्षकाच्या नावाने परस्पर मागितले सीसीटीव्ही फुटेज

by nagesh
Pune Crime | A police constable's mutual exploit; In the name of Deputy Superintendent of Railways, the CCTV footage was interrogated

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | लोहमार्ग उपअधीक्षकांच्या नावाने खोट्या सह्या करुन त्यांच्या शिक्क्यांचा वापर करुन कार्यालयातील शिपायाने बनावट पत्र तयार केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी लोहमार्ग उपअधीक्षक चंद्रकांत भोसले (DySP Chandrakant Bhosale) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७/२३) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी लोहमार्ग मुख्यालयातील कार्यालयीन कर्मचारी एस. सोनवणे याच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार ७ नोव्हेबर २०२२ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला होता. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकी येथे लोहमार्ग पोलीस मुख्यालय
(Lohmarg Police Headquarters) आहे. पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत भोसले यांच्या कार्यालयात सोनवणे
हा शिपाई आहे. त्याने फिर्यादी यांची परवानगीशिवाय कार्यालयात प्रवेश करुन कुलूप उघडले.
चंद्रकांत भोसले व पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या नावाचा गोल शिक्का तसेच फिर्यादी यांच्या खोट्या सहीचा वापर करुन स्वत:च्या फायद्यासाठी बनावट पत्र तयार केले.
ते खरे असल्याचे भासवून त्याने ते दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या (Dinanath Mangeshkar Hospital) व्यवस्थापकांना पाठविले.
त्यात त्यांनी हॉस्पिटलकडील सीसीटीव्ही फुटेजची (CCTV Footage) मागणी केली आहे.
हा प्रकार आता लक्षात आल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनवणे यांच्याकडे चौकशी केल्यानंतरच त्यांनी हे सीसीटीव्ही फुटेज का मागितले, हे समजू शकेल,
असे पोलिसांनी सांगितले असून सहायक पोलीस निरीक्षक वालकोळी (Assistant Police Inspector Walkoli) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | A police constable’s mutual exploit; In the name of Deputy Superintendent of Railways, the CCTV footage was interrogated

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी मुंबईत…’ (व्हिडिओ)

Apurva Nemlekar | बिग बॉस मराठी’ची फर्स्ट फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Arvind Sawant | ‘त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही’, अरविंद सावंतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

 

 

Related Posts