IMPIMP

Apurva Nemlekar | बिग बॉस मराठी’ची फर्स्ट फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

by nagesh
Apurva Nemlekar | bigg boss marathi 4 apurva nemlekar post saying i ill win this show goes viral

सरकारसत्ता ऑनलाईन   टीम – ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे टॉप पाच फायनलिस्ट मिळाले आहेत. यातील टिकट टू फिनालेचा टास्क जिंकत अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची पहिली फायनलिस्ट ठरली. 95 दिवसांचा टप्पा पार करून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर बिग बॉसच्या मराठीच्या शेवटच्या आठवड्यात पोहोचली. तिच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. (Apurva Nemlekar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अपूर्वाच्या लाल साडीतील या फोटोला “लाल रंगाची साडी नेसणाऱ्यांनाच माहीत आहे त्यांच्याकडे किती शक्ती असते”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. “कोणीही यावं कोणीही जावं शेवटी मीच जिंकावं”, असंही पुढे कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर खूप चर्चेत आहे. स्पष्ट बोलणे आणि ठाम भूमिकेमुळे तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळचा सिझन ती जिंकू शकते यावर तिच्या चाहत्यांना ठाम विश्वास आहे. आरोह वेलणकरने खेळातून एग्झिट घेतल्यानंतर त्याचा घरातील प्रवास संपुष्टात आला आहे.

 

 

अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, किरण माने, अक्षय केळकर व अमृता धोंगडे यंदाच्या पर्वाचे टॉप 5 फायनलिस्ट ठरले आहेत.
2021 मध्ये झी मराठीच्या रात्रीस खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरात जाऊन पोहोचली.
या भूमिकेसाठी तिला झी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘बिग बॉस मराठी – 4’ या खेळासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली.
तिने केवळ भांडणच केली नाही तर मेघा, स्नेहलता, अक्षय यांच्याशी प्रेमाचे संबंधही जोपासले.
अपूर्वा जशी होती तशीच वागली आणि शेवटपर्यंत आपल्या मतांवर ठाम राहिली. म्हणूनच थेट बिग बॉसनेच कौतुक केलं.
अशी हर हुन्नरी अपूर्वा आता ट्रॉफी पासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे तिचे सर्वांकडून कौतुक केले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Apurva Nemlekar | bigg boss marathi 4 apurva nemlekar post saying i ill win this show goes viral

 

हे देखील वाचा :

Arvind Sawant | ‘त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही’, अरविंद सावंतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

Maharashtra Police | पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात मोठी वाढ, राज्य सरकारची घोषणा

 

Related Posts