IMPIMP

Devendra Fadnavis | योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होणाऱ्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘उद्योगाला आकृष्ट करण्यासाठी मुंबईत…’ (व्हिडिओ)

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on industries went to other state

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh CM Yogi Adityanath) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. महाराष्ट्रातील उद्योग (Industry) पळवण्यासाठी ते आले असल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे. या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिले आहे. देशात कोणालाही उद्योग आकृष्ट करण्यासाठी, उद्योगांची परिषद आयोजित करण्यासाठी मुंबईत येण्याशिवाय पर्याय नाही. मुंबई ही महाराष्ट्राची ताकद आहे. कोणीही कितीही बोलले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सांगितले. ते पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, कोणीही कोणाचा उद्योग पळवून नेऊ शकत नाही. आपली एक मोठी शक्ती आहे. प्रत्येक राज्याची ताकद असते, भौगोलिक परिस्थिती असते, काही नैसर्गिक फायदे असतात. त्यानुसार काही उद्योग जात असतात. उदाहणार्थ गुजरात, राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात वाळवंट असल्याने त्यांच्याकडे जमिनीची उपलब्धता आहे. तीन-चार लाख एकर जमीन सोलर पॅनलसाठी (Solar Panel) उपलब्ध होते. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन सारखे (Green Hydrogen) उद्योग तिकडे जातात. तेवढी जमीन कदाचित आपल्याकडे उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे कोणीही कितीही बोलले तरी भारताची आर्थिक राजधानी मुंबईच असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

जनता त्यांना जाणता राजा म्हणणार नाही
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (NCP Leader Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना आम्ही जाणता राजा (Janata Raja) म्हणणारच असे म्हटले आहे.
यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, कोणाला काय म्हणायचे असेल ते म्हणा.
या देशात जाणते राजे एकच ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.
त्यामुळे आपल्या नेत्यांना कोणाला काही म्हणायचं असेल तर त्यांनी म्हणाव,
मात्र जनता त्यांना म्हणणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra fadnavis reaction on industries went to other state

 

हे देखील वाचा :

Apurva Nemlekar | बिग बॉस मराठी’ची फर्स्ट फायनलिस्ट अपूर्वा नेमळेकरची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Arvind Sawant | ‘त्यांना दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसत, पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ नाही’, अरविंद सावंतांचा बावनकुळेंवर हल्लाबोल

Central Government | केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नववर्षभेट; विविध योजनांसाठी मिळाले एवढे कोटी रूपये

 

Related Posts