IMPIMP

Pune Crime | विनयभंगाची तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणीने पोलीस चौकीत केला आत्महत्येचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | A young woman who came to complain of molestation attempted suicide at the police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ओळखीच्या तरुणाने भर रस्त्यात मिठी मारुन विनयभंग (Molestation) केल्या प्रकरणी महर्षीनगर पोलीस चौकीत (Maharshinagar Police Chowk) तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीने ओढणीने आत्महत्या (Suicide Attempt) करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (Swargate Police) १९ वर्षाच्या तरुणीवर आत्महत्येस प्रयत्न केल्याचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. तसेच या तरुणीने स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १८५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मोहसीन तन्वीर खान Mohsin Tanveer Khan (वय २१, रा. गुलटेकडी) याला अटक (Arrest) केली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व मोहसीन खान हे दोघे ओळखीचे आहेत. खान याने या तरुणीला २८ ऑगस्ट रोजी फोन करुन गुलटेकडी येथील व्हेईकल डेपोच्या ग्राऊंडमध्ये बोलविले. ही तरुणी रात्री ११ वाजता तेथे गेली असताना खान याने फिर्यादीस मिठी मारुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यावर फिर्यादीने काय करतोय, असे विचारले असता त्याने तुझ्याशी लग्न करणार आहे, असे म्हणाला. कोणास काही सांगितले तर बदनामी करुन तुझे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिली. (Pune Crime)

 

या घटनेची तक्रार देण्यासाठी फिर्यादी आपल्या नातेवाईकांना घेऊन मंगळवारी महर्षीनगर पोलीस चौकीत आली होती.
मोहसीन याने लग्न करण्यास नकार दिला असताना तिची तक्रार नोंदवून घेत असताना
पहाटे ४ वाजता उठून जाऊन ओढणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी तिला असे करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जमदाडे (Assistant Police Inspector Jamdade) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | A young woman who came to complain of molestation attempted suicide at the police station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पत्नीचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न; वानवडीत संदीप घुले विरुद्ध FIR

Bank Holidays | सप्टेंबरमध्ये 12 दिवस होणार नाही बँकांचे कामकाज, पहा सुट्ट्यांची पूर्ण यादी

Mahlunge-Maan Town Planning Scheme | म्हाळुंगे-माण टीपी स्कीमच्या कामाला गती देण्याचे PMRDA च्या आयुक्तांचे आदेश

 

Related Posts