IMPIMP

Pune Crime | भांडण सोडविणे पडले महागात; गुंडांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन केला जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | ओळखीच्या लोकांमध्ये सुरु असलेली भांडणे सोडविणे एका गृहस्थाला चांगलेच महाग पडले आहे. भांडणे सोडविली याचा राग मनात धरुन गुंडाच्या (Pune Criminals) टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याप्रकरणी जफर अब्दुल कयुम हकीम Zafar Abdul Qayyum Hakeem (वय ५०, रा. भीमपुरा गल्ली, कॅम्प Camp, Pune) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद ( गु. रजि. नं. ७६/२२) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी हैदरअली रफिक शेख Haider Ali Rafiq Sheikh (वय २९, रा. नाना पेठ – Nana Peth, Pune) आणि उमेर जावेद शेख Umer Javed Sheikh (रा. भवानी पेठ – Bhavani Peth, Pune) यांना अटक (Arrest) केली आहे. त्यांचा साथीदार उमरअली शाकीर शेख (Umar Ali Shakir Sheikh) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हैदरअली शेख हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आहे. फिर्यादी यांच्या ओळखीचे इशराक ऊर्फ इना व फुरकान यांच्याशी उमरअली व उमेर यांच्याबरोबर भांडणे सुरु होती. ही भांडणे फिर्यादी यांनी सोडविली. याचा राग मनात धरुन फिर्यादी हे ए डी कॅम्प चौकाजवळ शनिवारी रात्री पावणेदहा वाजता इना व फुरकान यांच्याशी बोलत थांबले होते. यावेळी शेख व त्याचे साथीदार आले. त्यांनी “इस जफरको तो अभी हम जानसेही मार डालेंगे, कोई बिचमे आयेगा नाही,” असे बोलून हैदरअली याने कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यात वार केला. उमरअली हा त्यांच्या डोक्यात वार करीत असताना त्यांनी डावा हात मध्ये घातल्याने हाताला गंभीर दुखापत झाली. उमेर याने लोखंडी रॉडने फिर्यादी यांना मारहाण करुन जखमी केले. पोलीस उपनिरीक्षक हाळे (Sub-Inspector of Police Hale) तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Attempt To Kill Incident In Samarth Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Migraine Pain | कडक उन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासाने असाल त्रस्त तर करा ‘हे’ खास उपाय, लवकर मिळेल आराम; जाणून घ्या

Worst Foods For Metabolism | कधीही कमी होणार नाही तुमचे वजन, जर खात रहाल ‘या’ 5 गोष्टी, जाणून घ्या

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात बाप अर्धनग्न फिरुन 13 वर्षीय मुलीला मिठी मारुन मासिक पाळीच्या काळात खोचक प्रश्न विचारुन करत होता विनयभंग

 

Related Posts