IMPIMP

Pune Crime | बरोबर येण्यास नकार दिल्याने तृतीयपंथीयावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | Attempt To Kill Murder Of Transgender in hadapsar vaiduwadi area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | घरी जात असलेल्या तृतीयपंथीयाला (Transgender) अडवून आपल्याबरोबर येण्याची गळ चौघांनी घातली. त्याला या तृतीयपंथीयाने नकार दिल्यावर त्याच्यावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder) करण्यात आला. (Pune Crime)

 

याप्रकरणी हडपसरमधील वैदुवाडी (Vaiduvadi Hadapsar) येथे राहणार्‍या एका २२ वर्षाच्या तृतीयपंथीयाने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ८९२/२२) दिली आहे. हा प्रकार हडपसरमधील कात्रज मंतरवाडी रोडवरील (Katraj Mantarwadi Road) इंदु स्टील कंपनीजवळ (Indu Steel Company) १२ जुलै रोजी रात्री दहा वाजता घडला. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या तृतीयपंथी असून त्या रात्री घरी जात होत्या. त्यावेळी चौघांनी त्यांना अडवून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जाण्याचा आग्रह करु लागले. त्याला फिर्यादी यांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी हाताने मारहाण केली. त्यांच्यातील एकाने कोयत्याने मानेवर वार केला. फिर्यादी यांनी हात आडवा घातला असता हाताला गंभीर दुखापत झाली.
त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या फिर्यादी यांनी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली असून
पोलीस उपनिरीक्षक खेडकर (Sub-Inspector of Police Khedkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Attempt To Kill Murder Of Transgender in hadapsar vaiduwadi area

 

हे देखील वाचा :

Metro Car Shed | CM एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली

Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

Global Economic Recession | कोरोनानंतर आता महागाईचा आगडोंब, कोट्यवधी लोक होतील गरीब, IMF ने दिला हा इशारा

 

Related Posts