IMPIMP

Metro Car Shed | CM एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली

by nagesh
Metro Car Shed | cm eknath shinde roll back ban order from aarey metro car shed

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन मुंबई मेट्रोच्या आरे येथील कारशेडचा (Metro Car Shed) मार्ग मोकळा झाला आहे. महाविकास आघाडी सरकारने (Maha Vikas Aghadi Government) आरे कारशेडवर घातलेली बंदी (Ban) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उठवली आहे. त्यामुळे कारशेड आरे (Metro Car Shed) येथे होणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. सरकारने आरेतील कारशेड वरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता आहे.

 

मागील काही महिन्यांपासून मुंबईत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामांवरील बंदी एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. त्यामुळे आरे कारशेडच्या कामासाठी आता सरकारी हालचाली सुरु झाल्या आहेत. आरेमध्ये कारशेड करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fadnavis Government) काळात निर्णय झाला होता. मात्र, यावर महाविकास आघाडीने स्थगिती आणली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

यापूर्वीच्या उद्धव ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray Government) आरे कॉलनीमधील होणारा हा प्रकल्प रद्द केला होता.
त्यानंतर शिंदे सरकारनं पहिल्याच बैठकीत ठाकरे सरकारचा निर्णय फिरवत पुन्हा एकदा मेट्रो 3 चे कारशेड हे आरे कॉलनीमध्येच होणार असल्याचे जाहीर केले होते.
यानंतर आता आरे कारशेडवरील बंदी हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.

 

Web Title :- Metro Car Shed | cm eknath shinde roll back ban order from aarey metro car shed

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रस्ता ओलांडण्यासाठी मदत करण्याच्या बहाण्याने 1 लाखांची सोन्याची कंठी माळ नेली चोरुन

चेकिंगदरम्यान ‘ब्रा’च्या हुक मुळे मेटल डिटेक्टरचा आवाज ! अंडरगार्मेंट्स चेकिंग वादात दोन शिक्षकांना अटक, NEET परीक्षेत दिला होता तपासणीचा आदेश

Global Economic Recession | कोरोनानंतर आता महागाईचा आगडोंब, कोट्यवधी लोक होतील गरीब, IMF ने दिला हा इशारा

 

Related Posts