IMPIMP

Pune Crime | जप्त मालमत्तेचा बँक मॅनेजरनेच केला अडीच कोटींचा अपहार; लोणीकंद पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime | Bank manager embezzled 2.5 crores of confiscated property; FIR in Lonikand Police Station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | जप्त केलेल्या मालमत्तेवर अस्तित्वात नसलेली सुरक्षा एजन्सी (Security Agency) नेमल्याचे दाखवून त्यांच्या पगारापोटी बँकेकडून पैसे घेतले. त्याचवेळी जप्त केलेल्या कंपनीतील मालमत्तेची विल्हेवाट लावून तब्बल २ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी (Cheating Case) युनियन बँक ऑफ इंडियाच्या (Union Bank Of India) पूर्व (तत्कालीन) मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत युनियन बँक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक ग्यानेंद्रकुमार शिवकुमार सिंग (रा. मुंबई) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४९६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिलकुमार सिंग (रा. गोकुळ विहार कॉम्प्लेक्स, मुुंबई) आणि संचालक शिवशक्ती असोसिएट (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २० जानेवारी ते २८ ऑगस्ट २०२२ दरम्यान अष्टापूर येथील पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग प्रा़ लि़ या कंपनीत घडला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग हे युनियन बँक ऑफ इंडिया अ‍ॅसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मुंबई येथे सहायक व्यवस्थापक आहेत. बँकेने अतुल दुधे यांच्या पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला कर्ज दिले होते. त्यांचा लोखंडी पाईप बनविण्याचा कारखाना आहे. कर्ज न फेडल्यामुळे तारण मालमत्ता म्हणून बँकेचे पूर्व व्यवस्थापक अनिलकुमार सिंग यांनी कारखाना सील केला. बँकेच्या सुरक्षा एजन्सी नियुक्त करण्याचे धोरणाकडे दुर्लक्ष करुन कर्तव्यास हयगय केली. शिवशक्ती सुरक्षा असोशिएट मुंबई या खासगी सुरक्षा एजन्सीकडे लायसन्स नसताना कर्ज तारण मालमत्ता त्यांच्या ताब्यात दिली. कायमस्वरुप तीन सुरक्षा रक्षक नेमणूक केल्याचे दाखवून त्यांचा पगार बँकेमार्फत दिला.

 

फिर्यादी ग्यानेंद्रकुमार यांनी कंपनीला भेट दिली असता तेथे साध्या वेशातील सुरक्षा रक्षक होते.
कंपनीतील मशीनरी चोरीला गेली असल्याचे त्यांना आढळून आले.
त्यांनी चौकशी केल्यावर अशी नोंदणीकृत सुरक्षा एजन्सी नसल्याचे आढळून आले.
त्यामुळे २ कोटी २८ लाख ३८ हजार रुपयांची मालमत्तेचा अपहार होण्यास कारणीभूत ठरल्यावरुन अनिलकुमार
याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Pune Crime | Bank manager embezzled 2.5 crores of confiscated property; FIR in Lonikand Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | बारामती एमआयडीसीतील परमिट रुममध्ये सुरु असलेल्या ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश

MLA Sada Saravankar | गोळीबारप्रकरण सदा सरवणकर यांना भोवणार?, गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त अन् घटनास्थळावरुन गोळीही जप्त

Employee Pension Scheme | पेन्शनसाठी पीएफ अकाऊंटमध्ये केव्हापर्यंत करावे लागेल योगदान? जाणून घ्या फायद्याची बाब

 

Related Posts