IMPIMP

MLA Sada Saravankar | गोळीबारप्रकरण सदा सरवणकर यांना भोवणार?, गुन्हा दाखल, पिस्तुल जप्त अन् घटनास्थळावरुन गोळीही जप्त

by nagesh
MLA Sada Saravankar | pistol of mla sada sarvankar seized by police of firing during political disput at mumbai uddhav thackeray Shivsena Prabhadevi Rada

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Shivsena Prabhadevi Rada | मुंबईतील प्रभादेवी येथे शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) झालेल्या राडा प्रकरणात आमदार सदा सरवणकर (MLA Sada Saravankar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सदा सरवणकर यांचे पिस्तुल (Pistol Seized) दादर पोलिसांनी (Dadar Police) जप्त केलं आहे. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या राड्यावेळी (Shivsena Prabhadevi Rada) सरवणकर यांनी गोळीबार (Firing) केल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. तसेच याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी रविवारी गुन्हा (FIR) दाखल करुन घटनास्थळावरुन गोळी जप्त (Bullet Seized) केली आहे. (MLA Sada Saravankar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गणेश विसर्जनासाठी (Ganesha Immersion) काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिवसेना आणि शिंदे गटाचे समर्थक समोरासमोर आल्याने मोठा राडा झाला होता. प्रभादेवी या ठिकाणी दोन्ही गटाचे समर्थक आमनेसामने आले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आदेश दिल्यानंतर वाद टळला होता. मात्र, शनिवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. सरवणकर यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. यानंतर सदासरवणकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख महेश सावंत (Mahesh Sawant) यांच्यासह शिवसैनिकांना पिस्तूलाचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. यानंतर सरवणकर यांच्यासह समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (MLA Sada Saravankar)

 

सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेच्या सुनील शिंदे (Sunil Shinde) यांनी केला होता.
या गोळीबारातून एक पोलीस जखमी होता होता वाचला होता, असंही सुनील शिंदे यांनी म्हटले होतं.
त्यानंतर सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली.
संतोष तेलवणे (Santosh Telwane) यांना शिवसैनिकांनी मारहाण केली होती.
यानंतर प्रभादेवीत राडा झाला होता. मध्यरात्री झालेल्या राड्यानंतर अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करुन पाच जणांना अटक (Arrest) केली होती.

 

Web Title :- MLA Sada Saravankar | pistol of mla sada sarvankar seized by police of firing during political disput at mumbai uddhav thackeray Shivsena Prabhadevi Rada

 

हे देखील वाचा :

Employee Pension Scheme | पेन्शनसाठी पीएफ अकाऊंटमध्ये केव्हापर्यंत करावे लागेल योगदान? जाणून घ्या फायद्याची बाब

Pune Crime | रुमवर पोरा-पोरींना आणतो, धंदा करतो? API असल्याचे धमकावून तरुणाला लुबाडले, सिंहगड रोड वरील घटना

Pune Crime | बनावट सोने गहाण ठेवून अहमदनगर शहर बँकेची गोल्ड व्हॅल्युअरने केली फसवणुक

 

Related Posts