पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | कौटुंबिक कलहातून (Family disputes) राहत्या घरात ओढणीने आत्महत्येचा प्रयत्न (attempt suicide) करणाऱ्या तरुणाचे पुणे पोलिसांनी (Pune Police) प्राण वाचवले. ही घटना गुरुवारी रात्री पुण्यातील (Pune Crime) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या (bharti vidyapeeth police station) हद्दीत घडली. पोलिसांना तरुणाचे मन परिवर्तन (mind Change) करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाच मिनिटात घटनास्थळी धाव घेत तरुणाचे प्राण वाचवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील बीट मार्शल ब्रह्मानंद केंद्रे (Beat Marshall Brahmananda Kendra) व नानासो खाडे (Nanaso Khade) हे गुरुवारी रात्री हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी केंद्रे यांना बिनतारी संदेश यंत्रणेवर एक तरुण आत्महत्या करत असल्याचा कॉल आंबेगाव येथील सिंहगड कॅम्पस (Sinhagad Campus Ambegaon) येथून मिळाला. घटनेची माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता केंद्रे आणि खाडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. याठिकाणी आपल्याच घरात एक तरुण खुर्चीवर उभे राहून ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत होता.
ब्रह्मानंद केंद्रे यांनी तात्काळ या तरुणाला खली घेऊन त्याला समजावून सांगत त्याचे मन परिवर्तन केले. आंबेगाव पठार मार्शल यांनी केलेल्या तात्काळ कारवाईमुळे एका तरुणाचे प्राण वाचले. तसेच त्याचे आत्महत्या करण्यापासून मनही परिवर्तन केल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर (Senior Inspector of Police Jagannath Kalaskar) यांनी केंद्रे आणि खाडे यांचे कौतुक करत अभिनंदन केले.
Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update
Web Title : Pune Crime | bharati vidyapeeth police save youth life suicide attempt pune crime news
Pune News | पॅन इंडिया कायदेशीर जनजागृती अभियान व पोहोच मोहीम सांगता समारंभ संपन्न