IMPIMP

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन खून करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

by nagesh
Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrested the accused who kidnapped and killed a builder

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | क्रिकेट बेटिंगमध्ये हरलेले पैसे परत दिले नाहीत, म्हणून एका 32 वर्षीय बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण करुन बेदम मारहाण करुन खून केल्याची घटना भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 नोव्हेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी (Pune Crime) पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

निखिल उर्फ संकेत चंद्रशेखर अनभुले (व-32 रा. स्वामी सदन, आंबेगाव बु. पुणे) असे खून झालेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी विशाल अमराळे, लहु माने, शुभम मोरे यांच्यावर आयपीसी 302, 364, 388, 341, 323, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत संकेत अनभुले यांच्या पत्नी हर्षदा अनभुले यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील तपास पथक आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार राहुल तांबे व अभिजीत जाधव यांना या गुन्ह्यातील आरोपी विशाल चंद्रकांत अमराळे (वय-35 रा. बिबवेवाडी) हा आंबेगाव पठार, चिंतामणी ज्ञानपीठ कडून हायवेकडे जाणाऱ्या रोडवर थांबल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. खुनाची घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला सात तासांच्या आत अटक केली. आरोपींनी संकेत अनभुले यांचे अपहरण करुन त्यांना कोंडुन ठेवत बेदम मारहाण केली. यामध्ये संकेत यांचा मृत्यू झाला होता.

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,
पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट, पोलीस निरीक्षक गुन्हे विजय पुराणिक,
सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसार, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार राहुल तांबे,
अभिजीत जाधव, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, रविंद्र भोरडे, राहुल शेडगे, हर्षल शिंदे, मंगेश पवार,
अवधूत जमदाडे, सचिन सरपाले, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, निलेश खैरमोडे, आशिष गायकवाड,
मितेश चोरमोले, अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Crime | Bharti Vidyapeeth police arrested the accused who kidnapped and killed a builder

हे देखील वाचा :

Mumbai Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोरघाटात कंटेनरने 6 गाड्यांना उडवलं

Sanjay Raut On Maharashtra Karnataka Border Issue | ‘शिवाजी महाराजांच्या मुद्यावरुन लक्ष हटविण्यासाठी भाजपने बोम्मई यांना पुढे करुन सीमावादाचा प्रश्न काढला’

Amruta Fadnavis On Bhagat Singh Koshyari | ‘राज्यपालांचे महाराष्ट्रावर प्रेम, पण… , त्यांच्या विधानाचा नेहमी चुकीचा अर्थ घेतला जातो’ – अमृता फडणवीस

Related Posts