IMPIMP

Pune Crime | पनवेलमध्ये फसवणूक करुन पुण्यात पळून आलेला तोतया पोलीस गुन्हे शाखेकडून गजाआड

by nagesh
Pune Crime News | Innkeeper who stole from PMPML bus arrested, valuables seized

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | स्विफ्ट कार विकण्याचा बहाणा करुन पनवेलमध्ये (Panvel) फसवणूक (Cheating Case) करुन
पुण्यात लपून बसलेल्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच आपण पुणे पोलीस (Pune Police) दलात एपीआय Assistant Police
Inspector (API) असल्याची बतावणी करुन धक्काबुक्की केली. तू मला नाव पत्ता विचारणारा कोण असे म्हणून अरेरावी करणाऱ्या तोतया पोलीस
अधिकाऱ्याला (Bogus Police Officer) गुन्हे शाखा युनिट सहाच्या (Pune Police Crime Branch) पथकाने बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. सिद्धेश्वर सुभाष नागरे Siddheshwar Subhash Nagre (वय – 33 रा. पुष्करनगर, पनवेल) असे अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) आव्हाळवाडी, वाघोली येथे सोमवारी (दि.11) करण्यात आली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमधील आनंद पाटील (Anand Patil) यांना नागरे याने कार विकण्याचा बहाणा केला. पाटील यांनी नागरे याला ठरल्याप्रमाणे पैसे दिले मात्र, आरोपीने त्यांना गाडी दिली नाही. पाटील यांनी पैशांची मागणी केल्यानंतर आरोपी नागरे पुण्यात (Pune Crime) पळून येऊन लपून राहत होता. पनवेल येथील गुन्ह्यातील आरोपी वाघोली (Wagholi) येथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट सहाचे पथक त्याला अटक करण्यासाठी गेले होते.

 

आव्हाळवाडी येथे पोलिसांच्या पथकाला एक लाल रंगाची स्विफ्ट कार दिसली. तसेच तिचा क्रमांक चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले व कारच्या डॅश बोर्डवर पोलीस असे लिहलेली पाटी लावण्यात आली होती. पोलिसांनी पथकाची ओळख सांगून त्याचे नाव व पत्ता विचारला. त्यावेळी तुम्ही मला नाव विचारणारे कोण ? मी पुणे पोलीस दलामध्ये (Pune Police Force) एपीआय आहे, असे बोलून त्याने पोलीस पथकासोबत धक्का – बुक्की करुन दमदाटी केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी आरोपी नागरे याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पोलीस दलामध्ये कार्यरत नसल्याचे सांगितले. तसेच तो राहत असलेल्या फ्लॅटच्या मालकाकडे चौकशी केली असता त्यांना देखील त्याने पोलीस असल्याचे सांगून भाडेकरू करारनामा केला नाही तसेच घरभाडे देखील दिले नसल्याचे सांगितले. याशिवाय घराच्या शेजारी असलेल्या भाजी विक्रेत्याला पोलीस असल्याचे सांगून पैसे न देता भाजी घेऊन गेल्याचे भाजी विक्रेत्याने सांगितले. आरोपीने पनवेल, नवी मुंबई येथे ही दोन ते तीन जणांना पोलीस असल्याचे सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी सिद्धेश्वर नागरे याच्या विरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करुन त्याला लोणीकंद पोलीस ठाण्याच्या (Lonikand Police Station) ताब्यात दिले आहे.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने (Police Inspector Ganesh Mane),
सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील (API Narendra Patil), पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे,
सचिन पवार, ऋषीकेश ताकवणे, ऋषीकेश व्यवहारे यांनी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Pune Crime | Bogus police officer who fled to Pune after cheating in Panvel pune police crime branch arrest him

 

हे देखील वाचा :

Neha Sharma Bralette Photo | नेहा शर्मानं ब्रालेट मधील फोटो शेअर करून सोशल मीडियावर केला कहर, मादक फोटेनं वाढवले चाहत्यांच्या हृदयाचे ठोके

Anti Corruption Bureau (ACB) Pune | राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील शिपाई आणि खासगी व्यक्ती अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Silver Oak Attack Case | ‘त्यांना’ ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याची माहिती होती’; भाजपचा खळबळजनक आरोप !

 

Related Posts