IMPIMP

Pune Crime Branch Police | पुण्याच्या विमाननगरमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा; 2 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime Branch Police | Crime Branch raids hookah bar in Vimannagar, Pune; 2 lakh confiscated

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime Branch Police | पुण्यातील विमाननगर (vimannagar) येथील दोन हॉटेलमध्ये अवैधरित्या चालू असलेल्या हुक्का बारवर (Hookah bar) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Crime Branch Police) पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी छापा टाकला. ही कारवाई सोमवारी (दि.30) हॉटेल तलब (Talab Hotel) या हुक्का बारवर करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

हॉटेलचा मालक सचिन अशोक रणपिसे Sachin Ranapise (वय-30 रा. येरवडा), अमर संतोष गायकवाड Amar Gaikwad (वय-26 रा. येरवडा) हॉटेल मॅनेजर दिलीपकुमार मांगीलाल मालविया (वय-26 रा. हडपसर) यांच्या विरोधात सिगारेट व अन्य तंबाखुजन्य उत्पादने (महाराष्ट्र सुधारणा) कायद्यांतर्गत विमानतळ पोलीस ठाण्यात (vimantal police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 हॉटेल तलब या ठिकाणी अवैधरित्या हुक्का बार चालू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan), अंमली पदार्थ विरोध पथक (Anti-drug squad) दोन पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad), अंमली पदार्थ विरोधी पथक एक व इतर पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला.

त्यावेळी हॉटेलचा मालक सचिन रणपिसे हा हॉटेल मॅनेजर मालविया याच्याकडून हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का बार चालवून ग्राहकांना हुक्का सेवन करण्यासाठी पुरवीत असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरोधात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने या कारवाईत वेगवेगळे हुक्का फ्लेवर्स, 11 हुक्का पॉट, चिलीम पाईप व दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला.

ही कारवाई पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (Pune CP Amitabh Gupta), पोलीस सह
आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Joint Commissioner Dr Ravindra Shisve), पोलीस उपायुक्त
श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक
शिल्पा चव्हाण (Police Inspector Shilpa Chavan), अंमली पदार्थ विरोधी पथक दोनचे
पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड (Police Inspector Vinayak Gaikwad) , अंमली
पदार्थ विरोधी पथक एक व समाजिक सुरक्षा विभागचे पोलीस अमंलदार यांच्या पथकाने केली.

 

Web Title : Pune Crime Branch Police | Crime Branch raids hookah bar in Vimannagar, Pune; 2 lakh confiscated

 

हे देखील वाचा :

MSRTC Electric Buses | आता लवकरच धावणार इलेक्ट्रिक एसटी ! पुण्यातून औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर आणि महाबळेश्वरचा प्रवास होणार ‘सुखद’

Bollywood Actress | ‘या अभिनेत्रीचा सवाल; म्हणाली – ‘मुलीने कंडोम विकत घेतल्यास त्यात वाईट काय?’

Pune Crime | स्वस्तात फ्लॅट देण्याच्या बहाण्याने 34 लाखांचा गंडा, कोंढवा पोलिस ठाण्यात दोघांवर FIR

 

Related Posts