IMPIMP

Pune Crime | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेच्या वार्षिक उत्सवातील वादातून प्रशिक्षकाला दंड आणि चामडी पट्ट्याने बेदम मारहाण

by nagesh
Pune Crime | Women's jewelry looted on the pretext of sari distribution; Incident at Lal Mahal Chowk

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) वार्षिक उत्सवामध्ये झालेल्या शाब्दीक वादाच्या रागातून शाखा प्रशिक्षकाला (Branch Instructor) लाकडी दंड, चामडी पट्ट्याने बेदम मारहाण (Beating) करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पुण्यातील (Pune Crime) सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी हर्षवर्धन सुनील हरपुडे Harshvardhan Sunil Harpude (वय – 21, रा. तावरे कॉलनी, सहकारनगर) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी कुंदन सोनावणे (Kundan Sonawane), रुपेश खाडे (Rupesh Khade), अमन शेख (Aman Sheikh), हेमंत जाधव (Hemant Jadhav) यांच्यासह चार ते पाच अल्पवयीन (Minor) मुलांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सहकारनगरमधील अध्यापक कॉलनीतील मैदानावर मंगळवारी रात्री साडेआठ वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षवर्धन हरपुडे हे एलएलबीचे (LLB) प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहेत.
ते अनेक वर्षांपासून अध्यापक कॉलनीतील मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शाखेत लहान मुलांना प्रशिक्षण देण्याकरीता जातात.
टांगेवाला कॉलनी येथे राहणारे हेमंत जाधव, कुंदन सोनावणे, अमन शेख व इतर हेही शाखेमध्ये येत होते. 4 ते 5 वर्षांपूर्वी शाखेच्या वार्षिक उत्सवामध्ये त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्यामुळे त्यांनी शाखेत येण्याचे बंद केले.

 

मंगळवारी नेहमीप्रमाणे ते शाखेत गेले होते.
शाखा संपल्यावर ते बाजूच्या कट्यावर बसले असताना काही लहान मुले अमित हिरणवाळे (Amit Hiranwale) याला हाताने मारहाण करु लागले.
तेव्हा फिर्यादी यांनी त्या मुलांना थांबवून भांडणे न करण्याचे समजावून सांगू लागले.
ही भांडणे पाहून हेमंत जाधव, कुंदन सोनावणे इतर तेथे आले. कुंदन याने कमरेच्या चामडी पट्ट्याने, रुपेश खाडे याने ग्राऊंडवर पडलेल्या झाड्याच्या फांदीने फिर्यादी यांना बेदम मारहाण केली.
कट्ट्यावर ठेवलेला लाकडी दंड फिर्यादीच्या पाठीत जोरात मारला.
सहायक पोलीस निरीक्षक बेरड (API Berad) तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Coach fined and beaten with leather belt over dispute in the annual festival of rss branch pune sahakarnagar

 

हे देखील वाचा :

Pregnancy Inners | प्रेग्नंसी दरम्यान असे असावेत महिलांचे इनरवेअर्स, इन्फेक्शनपासून होईल बचाव; जाणून घ्या

Beed Crime | एका रात्रीत असं काय झालं? नामांकित क्लासेस चालकाने केली आत्महत्या, नैराश्य की आणखी काही?, बीड शहरात खळबळ

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु ! भाजप अलर्ट मोडवर; आमदारांना मोबाईलवर बोलताना काळजी घेण्याच्या सूचना

 

Related Posts