IMPIMP

Rajya Sabha Election 2022 | राज्यसभेच्या निवडणुकीचं काऊंटडाऊन सुरु ! भाजप अलर्ट मोडवर; आमदारांना मोबाईलवर बोलताना काळजी घेण्याच्या सूचना

by nagesh
 Pune Kasba Bypoll Election | kasaba peth assembly bypoll who will become congress candidate 16 name in race

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइनRajya Sabha Election 2022 |  राज्यसभा निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून काळजी घेतली जात आहे. भाजपने आपल्या आमदारांना (BJP MLA) मुंबईत बोलावून घेत त्यांची हॉटेल ताजमध्ये (Hotel Taj) राहण्याची व्यवस्था केली आहे. या सर्व आमदारांना भाजपकडून काही सूचना देण्यात आल्या आहेत. मोबाईलवर बोलताना काळजी घ्या, मोजकचं बोला, अधिकचं बोलू नका, समोरुन बोलणारी व्यक्ती विश्वासातील आहे का ? याची खात्री करा, असा सूचना आमदारांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याशिवाय आमदारांनी हॉटेल बाहेर पडू नये अशा देखील सूचना भाजपच्या वतीने आमदारांना देण्यात आल्या आहेत. तसेच काही अडचण आली तर भाजपच्या संबंधितांशी तात्काळ संपर्क साधण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही सूत्रांनी सांगितले. राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) उद्या मतदान होणार आहे. रात्री 8 वाजेपर्यंत राज्यसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे.

 

राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा यंदा मोडीत निघाली असून 23 वर्षांनी ही निवडणूक होत आहे. भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने कोल्हापुरातील (Kolhapur) नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) आणि शिवसेनेने (Shivsena) कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार (Sanjay Pawar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे राज्यसभेत महाडिक जाणार की पवार हे उद्या रात्री स्पष्ट होईल.

 

फडणवीस पुन्हा सक्रीय होणार
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी काही तास उरले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे पुन्हा सक्रीय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फडणवीस यांना कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्याने ते होम क्वारंटाईन (Home Quarantine) आहेत.
त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला असून ते पुन्हा सक्रीय होणार आहेत.
आज रात्री उशिरापर्यंत फडणवीस हे आमदारांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Rajya Sabha Election 2022 | Maharashtra bjp instructions to mla for rajya sabha election 2022

 

हे देखील वाचा :

Ageing Slow Down | ‘एजिंग स्लो डाऊन’ करण्यासाठी ‘या’ 4 फूड हॅबिट्स करा फॉलो, जाणून घ्या सविस्तर

Ramdas Athawale | ‘2024 मध्येही मोदी सरकार येणार’ – रामदास आठवले

Kolhapur Crime | कोल्हापूर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! 6 वर्षाच्या चिमुकलीवर 36 वर्षीय नराधमाकडून अत्याचार

 

Related Posts