IMPIMP

Pune Crime | कॉन्ट्रॅक्ट गेल्याच्या रागातून शो-रुम मधील कर्मचाऱ्याला मारहाण, 3 जणांना अटक

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | शो-रूम मधील कॉन्ट्रॅक्ट (Showroom contract) गेल्याच्या राग मनात धरुन शो-रुमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण (Beating) केल्याची धक्कादायक घटना पुण्यात (Pune Crime) घडली आहे. ही घटना खराडी येथील कोठारी ह्युंदाई शोरुमच्या (Kothari Hyundai Showroom) गेट समोर सोमवारी (दि.23) रात्री आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

रशिद अब्बास मुल्ला (वय-57 रा. वडगाव शेरी), कुणाल विक्रम लोणकर (वय-28 रा. केशवनगर, मुंढवा), गजानन महादेवराव गौंडचोर (वय-45 रा. केशवनगर मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ओंकार सिताराम राखपसरे (वय-28 रा. मोरेवस्ती मांजरी फार्म) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलीस हवालदार शहाजी काळे (Shahaji Kale) यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओंकार हे
खराडी (Kharadi) येथील कोठारी ह्युंदायी शो-रुममध्ये कामाला आहेत. आरोपी रशिद मुल्ला हा
कंपनीमध्ये स्पेअर पार्ट विभागात (Spare part section) मॅनेजर म्हणून काम करतो. तर कुणाल लोणकर याच्याकडे कंपनीचे वॉशिंग (Washing) कॉन्ट्रॅक्ट आहे. कंपनीने लोणकर याचे वॉशिंगचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले. ओंकारमुळे आपले कॉन्ट्रॅक्ट रद्द झाल्याचा राग कुणालला आला होता. याच रागातून त्याने गजानन गौडचोर आणि मुल्ला यांच्या मदतीने ओंकारला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले. ओंकार राखपसरे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन अटक (Arrest) केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Controversy over contract beating of showroom employee, 3 arrested

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | राणेंच्या अटकेचा आदेश नेमका कुणी दिला? CM ठाकरे, अजित पवार, आणि अनिल परब?

Court News | लैंगिक संबंध ठेवले म्हणून लग्न करणं बंधनकारक नाही; न्यायालय म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील पोलीस ठाण्यात फिनाईल पिऊन महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रचंड खळबळ

 

Related Posts