IMPIMP

Pune Crime | पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून अटक

by nagesh
Pune Crime Branch Police | Pistol and cartridges seized from Sarait criminals, action taken by Crime Branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक (anti extortion cell) दोनने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोडवर आज (सोमवारी ) करण्यात आली. ही घटना 12 ऑगस्ट रोजी लोहगाव येथील साठे पेट्रोल पंपावर रात्री साडेबाराच्या सुमारास घडली होती. रोहन जयदीप चव्हाण (वय 19 रा. मंगळवार पेठ, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड व पोलीस अमंलदार शैलेश सुर्वे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहिवळे, महेश साळुंके, आयाज दडीकर हे कोंबिंग ऑपरेशनच्या अनुषंगाने हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी पोकळे मळा, सिंहगड रोड येथे थांबला आहे. अशी माहिती पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे (Surendra Jagdale) व शैलेश सुर्वे (Shailesh Surve) यांना समजली. त्यानुसार पथकाने आरोपी रोहन चव्हाण याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान आरोपी रोहन चव्हाण यांने त्याचे साथिदार अनिकेत जाधव (रा. ढोर गल्ली, गणेश

पेठ, पुणे) याच्या मदतीने विमानतळ पोलीस ठाण्याच्या (viman nagar police station)
हद्दीतील लोहगाव येथील साठे पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला कोयत्याचा धाक दाखवून 16 हजार
रुपये जबरदस्तीने चोरल्याची कबुली दिली. आरोपींनी चोरलेले पैसे वाटून घेतले होते. खंडणी विरोधी
पथकाने आरोपी चव्हाण याच्याकडून गुन्ह्यातील 5100 रुपये जप्त केले आहेत. खंडणी विरोधी
पथकाने केलेल्या तपासात विमानतळ आणि फरासखाना पोलीस ठाण्यातील (faraskhana
police station) दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे,

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (police inspector balaji pandhare) आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : Pune Crime | Crime Branch anti-ransom squad arrests petrol pump employee

 

हे देखील वाचा :

Mumbai Crime | खळबळजनक ! हात पाय बांधून नंतर गळा आवळून 60 वर्षीय वृद्धाची केली निर्घृण हत्या; दोघांना अटक

CBI Anti Corruption Trap | 2 लाखाची लाच घेताना विभागीय अभियंता आणि 40 हजाराची लाच घेताना कार्यालय अधीक्षक CBI च्या जाळ्यात

MNS | मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू’

 

Related Posts