IMPIMP

Mumbai Crime | खळबळजनक ! हात पाय बांधून नंतर गळा आवळून 60 वर्षीय वृद्धाची केली निर्घृण हत्या; दोघांना अटक

by nagesh
Builder Paras Porwal Suicide | mumbai famous builder paras porwal ended his life by jumping from the building

मुंबई न्यूज : सरकारसत्ता ऑनलाइन –  Mumbai Crime | मुंबईमधील नवीन पनवेल (New Panvel) ठिकाणी एक संतापजनक घटना समोर आली आहे. येथील एका 60 वर्षांच्या वृद्धाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली आहे. ही घटना पनवेल येथील ओवाळे परिसरात घडली आहे. आरोपींनी वृद्धाचे हात पाय बांधून, नाकातोंडात मिरची पूड टाकून गळा आवळून हत्या (Murder) केली आहे. या घटनेमुळे पनवेल परिसरात खळबळ (Mumbai Crime) उडाली आहे. बाळाराम चंदर पाटील (वय, 60, रा. नवीन पनवेल,ओवाळे परिसर) असे हत्या झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) अवघ्या 24 तासांत मुख्य आरोपीला बुलडाणा येथून ताब्यात घेतले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याबाबत माहिती अशी, बाळाराम पाटील (Balaram Patil) याची एका महिलेनं आपल्या एका पुरुष साथीदाराच्या मदतीनं निर्घृण हत्या केली आहे.
आरोपींनी बाळाराम पाटील यांचे हातपाय बांधत, त्यांच्या नाकातोंडात मिरचीपूड टाकून गळा आवळून हत्या केली आहे.
यानंतर आरोपींनी घरातील वीस तोळे सोने देखील चोरले आहे.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
तात्काळ तपासाला सुरुवात करून 2 आरोपींना अटक केले आहे.
तसेच, आरोपींकडून 17 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

दरम्यान, आरोपी महिला (accused woman) बुलडाणा ते नवी मुंबई असा प्रवास करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर पोलिसांच्या पनवेल शहर पोलिसांच्या (Panvel City Police) डीबी पथकानं (DB Squad) आरोपी महिलेला ताब्यात घेतलं आहे.
आरोपी महिलेकडे चौकशी केली असता, तिने हा गुन्हा आपला पुरूष साथीदार मंगेश खेत्री (Mangesh Khetri) याच्या मदतीनं केल्याची माहिती दिली.
तसेच, या माहितीच्या आधारे बुलडाण्यात गेलेल्या पोलीस पथकाने आरोपी मंगेशला बुलडाण्यातून अटक केली आहे.
या अशा धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या घटनेचा पोलिसांनी 24 तासांत छडा लावला आहे.

 

Web Title : Mumbai Crime | first tied limbs and murder by strangulation two arrested in 24 hours

 

हे देखील वाचा :

CBI Anti Corruption Trap | 2 लाखाची लाच घेताना विभागीय अभियंता आणि 40 हजाराची लाच घेताना कार्यालय अधीक्षक CBI च्या जाळ्यात

MNS | मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू’

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Mumbai Crime | वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा परदेशात नेऊन केला 8 वेळा गर्भपात, सासरच्या मंडळींवर FIR दाखल

Afghanistan Crisis | रक्तपात टाळण्यासाठीच अफगाणिस्तानातून पलायन; फेसबूक पोस्टद्वारे अश्रफ घनीनीं केला खुलासा

 

Related Posts