IMPIMP

Pune Crime | मारहाण चुकविण्यासाठी हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरुन उडी मारल्याने तृतीयपंथीचा मृत्यु़; वाकडमधील द बार हिस्ट हॉटेलमधील घटनेत मॅनेजरवर गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | नाचताना झालेल्या वादातून हॉटेलमधील मॅनेजर (Hotel Manager), बाऊंसर (Bouncer) यांनी मारहाण (Beating) केल्याने त्यांना चुकविण्यासाठी त्याने दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात एका तृतीयपंथीचा (Transgender) मृत्यु (Death) झाला. वाकड पोलिसांनी (Wakad Police) हॉटेलच्या मॅनेजरविरोधात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी एका २४ वर्षाच्या तृतीयपंथीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ६४६/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी द बार हिस्ट हॉटेलचे (The Bar Hist Hotel) मॅनेजर गजानन खरात (Gajanan Kharat) याच्यावर गुन्हा दाखल केला. ही घटना २५ जुलै रोजी पहाटे २ वाजता घडली. अभय मनोज गोंडाणे (Abhay Manoj Gondane) (वय २१, रा. येरवडा) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा तृतीयपंथी असून त्याचा मित्र अभय हा विमाननगर येथील एका कंपनीत कस्टमर एक्झीक्युटिव्ह (Customer Executive) म्हणून काम करीत होता. मीस्ट ऑर्गनाशझेशन (Meest Organization) या कंपनीकडून एलजीबीटी लोकांसाठी पार्टी आयोजित केली होती. त्यासाठी फिर्यादी अभय सोबत द बार हिस्ट हॉटेलमध्ये गेले होते. यावेळी पार्टीमध्ये मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ते नाचत असताना दुसर्‍या एका तृतीयपंथीबरोबर किरकोळ भांडणे झाली. यावेळी हॉटेलचे मालक व त्यांची पत्नी तसेच मॅनेजर गजानन खरात यांनी त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले. त्याचा राग आल्याने अभय हा पुन्हा हॉटेलमध्ये आत गेला. तेव्हा तेथे असलेला बाऊंसर, बार टेंडर, डी जे व मॅनेजर गजानन खरात यांनी दोघांच्या डोक्यात खुर्च्या मारल्या. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. (Pune Crime)

 

तेव्हा घाबरुन अभय हा पळत बाहेर गेला. त्याच्या मागोमाग गजानन खरात गेला. त्याच्यापासून वाचविण्यासाठी अभय लॉबीत गेला.
तेथून पळून जाण्यासाठी जागा नसल्याने त्याने मरणाच्या भितीने दुसर्‍या मजल्यावरुन खाली उडी मारली.
अभय खाली रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये (Aditya Birla Hospital) नेले.
तेथे प्राथमिक उपचार करुन ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) आणण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला.
त्याच्या मृत्युस जबाबदार धरुन पोलिसांनी मॅनेजर गजानन खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :- Pune Crime | Death of third party after jumping from second floor of hotel to avoid beating A case has been registered against the manager in the incident at The Bar Hist Hotel in Wakad

 

हे देखील वाचा :

Bomb Grenade Found in Pune | पुण्यात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळल्याने प्रचंड खळबळ, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक दाखल

Mumbai High Court | आम्हाला लहान मुलं समजता का?; हायकोर्टाने राज्य सरकारला चांगलेच सुनावले

Shinde Fadnavis Government | शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! पर्यटन विभागाच्या 59 हजार 610 कोटींच्या विकासकामांना स्थगिती

 

Related Posts