IMPIMP

Pune Crime | पुण्यात मांत्रिकाच्या मदतीने आघोरी पुजा करुन पतीला ब्लॅकमेक करुन 1 कोटीची मागणी; पत्नीसह 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Demand of Rs 1 crore for blackmailing her husband by performing Aghori Puja with the help of a witch in Pune; Filed a case against 12 people including his wife

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पती-पत्नीतील भांडणात पतीची फसवणुक करुन लाल कुंकु, मंतरलेले लिंबु, अंथरुणात मंतरलेले तांदुळ टाकणे असे आघोरी प्रकार करुन मांत्रिकाचे ऐकले नाही तर खानदानाचा नाश होईल असे धमकावुन तरुणाला ब्लॅकमेल करुन १ कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी पत्नीसह सासरच्याकडील १२ जणांविरुद्ध जादुटोणा प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

हा प्रकार कोथरुडमधील कुंबरे पार्क सोसायटीत ११ मार्च २०२० पासून आतापर्यंत घडला आहे. याप्रकरणी भूगाव येथे राहणार्‍या एका ४० वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्याची पत्नी व तिचे आई वडिल  आणि इतर नातेवाईकांवर ३८३, ४२०, ५०३, ५०४, ४९९, ५०६, १२० ब, तसेच नरबळी, अनिष्ठ  व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचे पत्नीशी पटत नव्हते.
त्यामुळे त्या माहेरी निघून गेल्या होत्या. २०१४ मध्ये त्यांच्या तडजोड झाली.
त्यानंतर सुमारे ६ वर्षे त्यांनी संसार केला. त्यानंतर मार्च २०२० मध्ये फिर्यादी यांच्या पत्नीने सासरच्या लोकांच्या सांगण्यावरुन फिर्यादी यांची फसवणूक करुन त्यांना लाल कुंकु,

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

मंतरलेले लिंबु, तांदुळ अंथरुणात टाकणे असे अघोरी प्रकार केले.
त्यांच्या ओळखीच्या देवबाप्पा नावाच्या मांत्रिकाकडे दिव्य शक्ती आहे.
त्याचे ऐकले नाही तर तुझ्या खानदानाचा नाश होईल, असे धमकाविले.
त्यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी दाखल केल्या.

 

पत्नी व तिच्या सासरकडील लोकांनी कट रचून संगनमत करुन फिर्यादी व त्याच्या कुटुंबियांला ब्लॅकमेल करुन १ कोटी रुपयांची मागणी केली.
पैसे दिले नाही तर तुझ्याविरुद्ध तुझ्या पत्नीला खटले दाखल करायला सांगतो व फिर्यादी यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
फिर्यादीची सर्वत्र बदनामी केली, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांवर त्याच्या पत्नीने गेल्या वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये कौटुंबिक हिसांचार प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
त्यानंतर फिर्यादी याने न्यायालयात धाव घेऊन फिर्यादी दाखल केली आहे.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी केळकर यांनी याप्रकरणी १५६ (३) प्रमाणे गुन्हा दाखल करुन चौकशी करुन अहवाल सादर करण्याचा आदेश कोथरुड पोलिसांना दिला आहे.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक राठोड तपास करीत आहेत.

 

 

Web Titel :- Pune Crime | Demand of Rs 1 crore for blackmailing her husband by performing Aghori Puja with the help of a witch in Pune; Filed a case against 12 people including his wife

 

हे देखील वाचा :

Pune Cyber Crime | धनंजय मुंडे, करुणा शर्मांचे फोटो टाकून FB वर बदनामीकारक ‘पोस्ट’ ! शरद पवार, फडणवीस, संजय राऊत यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांबद्दल अश्लिल ‘मजकूर’; पुण्यात गुन्हा दाखल

Nipah Test Kit | तासाभरात निपाहची लागण झाली की नाही हे समजणार; भारतात टेस्ट किटला परवानगी

Pune Rains | आगामी 5 दिवस पुण्यात ‘मुसळधार’ पाऊस ! IMD कडून अलर्ट’

 

Related Posts