IMPIMP

Nipah Test Kit | तासाभरात निपाहची लागण झाली की नाही हे समजणार; भारतात टेस्ट किटला परवानगी

by nagesh
Nipah Test Kit | nipah test kit indias largest weapon nipahs result will come within hour

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Nipah Test Kit | मागील दिड वर्ष कोरोना महाभंयकर विषाणुने देशासहीत जगात धुमाकुळ घातला आहे. यामुळे अनेक लोकांची दैना झाली. या विषाणुला आवरुपर्यंत आणखी एका विषाणुने डोकं वर काढलं आहे. भारतात निपाह नावाचा विषाणु (Nipah Test Kit) आढळला आहे. हा विषाणु सर्वात आधी केरळात (Keral) दाखल झाला असुन याचा प्रसार होण्याची धास्ती देखील देशाला लागली. केरळलगत असणा-या कर्नाटक, तामिळनाडु राज्यात काळजी घेतली नाही तर, हा विषाणुचा फैलाव होण्याचा धोका आहे. मात्र, विशेष म्हणजे निपाह विषाणुचा (Nipah virus) स्वॅब हा पुण्याच्या लॅबमध्ये पाठवावा लागतो. पण आता या विषाणुचा निकाल तासाभरातच लागणार आहे.

निपाह व्हायरसची (Nipah virus) लागण झालीय की नाही याची माहिती एका तासातच मिळणार आहे. निपाह व्हायरसचा शोध घेणारे पहिले टेस्ट किट समोर आले आहे.
निपाह व्हायरसच्या वाढत्या धोक्यावर भारताच्या हाती मोठे शस्त्र लागले आहे.
ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने गोव्याची कंपनी मोल्बियो डायग्नोस्टिकच्या टेस्ट किटला (Test kit of Molabio Diagnostics) आपत्कालीन परवानगी देण्यात आली आहे.
ट्रूनेट नावाच्या या टेस्ट किटच्या माध्यमातुन एका तासात रिझल्ट येणार आहे.
हे टेस्ट किट RTPCR प्लॅटफॉर्मवर आधारित आहे.

ट्रूनेटच्या (Trunet) माध्यमातून जवळपास 30 रोगांची तपासणी केली जाऊ शकते.
तसेच तासाभरात याचे निकाल येतात. या किटमुळे टीबी, कोरोना, डेंग्यू, चिकनगुनिया, हिपॅटायटीस, एचपीवी सारख्या रोगांची तपासणी केली जाऊ शकते.
दरम्यान, हे टेस्ट किट ब्रिफकेसमध्ये ठेवून कुठेही नेता येऊ शकते.
हे किट आंतरराष्ट्रीय बाजारातही लाँच करण्यात आले आहे. त्याचे पेटंटही करण्यात आले आहे.
कमी काळाच्या प्रशिक्षणानंतर देखील हे किट वापरता येईल, असे डिझाईन करण्यात आले.
अशी माहिती मोल्बियोचे सीईओ चंद्रशेखर नायर (CEO Chandrasekhar Nair) यांनी दिली आहे.
तर, पहिला रग्ण 2001 मध्ये सिलीगुडीमध्ये आढळला होता.
त्यानंतर 2007 मध्ये पश्चिम बंगाल आणि 2018 मध्ये केरळच्या कोझिकोडमध्ये आढळला होता.

Web Title : Nipah Test Kit | nipah test kit indias largest weapon nipahs result will come within hour

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

हे देखील वाचा :-

Crime News | स्विमिंग पूलमध्ये महिला पोलिसासोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलिस उपाधीक्षकाला अटक

Ajit Pawar | … तरच महाविकास आघाडीला निवडणुकांमध्ये यश मिळेल – अजित पवार

India vs England 5th test | …म्हणून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वी कसोटी रद्द; इंग्लंड विजयी घोषित

Related Posts