IMPIMP

Pune Crime | सोसायटीतील वाद ! 60 वर्षाच्या गृहस्थाने शेजार्‍यावर चक्क केला खुनी हल्ला

by nagesh
Pune Crime | A senior citizen was stabbed and his mobile taken away; Morning incident at Kharadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सोसायटीतील पाणी पुरवठा व इतर कारणावरुन झालेल्या वादातील राग मनात धरुन एका ६० वर्षाच्या गृहस्थाने लोखंडी सळई डोक्यात मारुन एकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt To Kill) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) प्रमोद गुलाबराव राक्षे (वय ६०, रा. विघ्नहर्ता कॉम्प्लेक्स, मांगडेवाडी, कात्रज) यांना अटक केली आहे.

 

याप्रकरणी सूर्यकांत भानुदास सितापुरे (वय ४०) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सितापुरे आणि प्रमोद राक्षे हे दोघेही विघ्नहर्ता कॉम्प्लेक्समध्ये राहतात. साधारण २ ते ३ महिन्यांपूर्वी सोसायटीतील पाणी पुरवठा व इतर कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता (Pune Crime). रविवारी रात्री पावणे अकरा वाजता सूर्यकांत सितापूरे हे इमारतीच्या पार्किंगमध्ये असताना जुन्या वादाच्या रागातून राक्षे यांनी मागून येऊन त्यांच्या डोक्यात लोखंडी सळईने मारहाण केली. ते मागे फिरले असता तुला खल्लास करणार, सोडणार नाही, असे म्हणून पुन्हा दोनदा त्यांच्या डोक्यात सळईने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांची पत्नी सोडवण्यास आली असताना त्यांनाही शिवीगाळ केली. पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन प्रमोद राक्षे यांना अटक केली आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Disputes in society A 60 year old man attacked his neighbor

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यात सावत्र बापच बनला नराधम ! 16 वर्षाच्या मुलीला धमकावून केला वारंवार बलात्कार

Pune Crime | पुण्यात चारित्र्याच्या संशयावरुन 26 वर्षीय पत्नीचा खून ! मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासवर दिला टाकून

LPG Price Hike | महागाईचा डबल अटॅक ! पेट्रोल-डिझेलने दिला जोरदार झटका, घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ

 

Related Posts