IMPIMP

Pune Crime | पुण्यात बाप-लेकाच्या खूनामुळे प्रचंड खळबळ, हल्लेखोरांची नावे निष्पन्न

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | पुण्याच्या लोणीकंद (Lonikand) परिसरात आज (बुधवार) सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दुहेरी
खुनाची (Double Murder in Pune) घटना घडली आहे. मारेकर्‍यांनी कोयता, बेसबॉल आणि दगडाने ठेचून बाप-लेकाचा खून (Murder in Pune)
केला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणीकंद पोलिस ठाण्यातील (Lonikand Police Station) पोलिस अधिकारी तसेच गुन्हे शाखेतील अधिकार्‍यांनी घटनास्थळी (Pune Crime) धाव घेतली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सनी कुमार शिंदे Sani Kumar Shinde (22), कुमार शिंदे Kumar Shinde (55) असे खून झालेल्या दोघांची नावे आहेत. सनी हा कुमार शिंदे यांचा मुलगा आहे. गेल्या वर्षी एका खून प्रकरणात सनी शिंदे यास अटक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासुन तरूंगात असलेल्या सनीची 3 महिन्यापुर्वी जामिनावर मुक्तता झाली. तो तरूंगाच्या बाहेर आला. आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास लोणीकंद येथील शाळेच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोरांनी सनी शिंदेला गाठले. त्यावर कोयता, बेसबॉलने हल्ला (Pune Crime) चढविला. त्यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर देखील हल्लेखोरांनी त्याला दगडाने ठेचण्यास सुरूवात केली.

 

 

सनीचे वडिल कुमार शिंदे तेथे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर देखील हल्ला केला. हल्लेखोरांच्या हल्ल्यात सनी आणि कुमार शिंदे हे दोघेही गंभीररित्या जखमी झाले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. घटनची माहिती मिळताच लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार (Senior Police Inspector Gajanan Pawar) आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहचले. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे पिता-पुत्राचा खून हा पुर्ववैमनस्यातून झाल्याची माहिती समोर आली आहे. लोणीकंद पोलिस प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून पोलिस त्यांच्या शोधात आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Double Murder in Lonikand area of Pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांकडून अटक

Pune Corporation | कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पुणे महापालिकेत कामाशिवाय प्रवेशबंदी ! लसीचे दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्रही अनिवार्य

PM Jan-Dhan Account मध्ये जमा रक्कमेबाबत मोठे अपडेट, जाणून घ्या काय सांगतात Finance ministry चे हे आकडे

 

Related Posts