IMPIMP

Pune Crime | लग्न केलेल्या पत्नीचीही ठग ‘शांतनु’ ने केली फसवणूक; पत्नीच्या नावावर परस्पर काढले 16 लाखांचे कर्ज

by nagesh
 Pune Crime News | A form of extorting money from a young man by threatening him with a love trap; A case has been registered against a young woman in Mumbai

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) तरुणींबरोबर सलगी वाढवायची, त्यांच्याशी शारीरीक संबंध निर्माण करायचे. नकळत त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढायचे, असे प्रताप शांतनु गजानन महाजन याचा आणखी एक कारनामा उघड झाला आहे. त्याने चक्क आपल्या पत्नीच्या नावावर १६ लाख ४२ हजार रुपयांचे कर्ज काढल्याचे उघडकीस आले आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी त्यांच्या ३२ वर्षाच्या पत्नीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०७/२२) दिली आहे. शांतनु गजानन महाजन (रा. खराडी, मुळ रा. वाशिम) असे या ठगाचे नाव आहे. महाजन याच्या विरुद्ध यापूर्वी चंदननगर, येरवडा व मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल होते. हा चौथा गुन्हा आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात (Yerwada Jail) आहे. महाजन याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले असून तो शादी डॉट कॉम या विवाहविषयक वेबसाईटवरुन तरुणीला हेरत असे. त्यांना लग्नाचे आमिष दाखवित. त्यांच्याशी जवळीक वाढवत. त्यातील एका तरुणीबरोबर त्यांने शारीरीक संबंधही निर्माण केले होते. या काळात त्यांच्याकडून मोबाईल घेऊन त्याद्वारे त्यांचा पासवर्ड, ई – मेल याची माहिती करुन घेत असे. त्यानंतर तो त्यांच्या नावावर कर्ज घेत असे. अशाच एका प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर हे प्रकार उघडकीस आले. (Pune Crime)

 

फिर्यादी तरुणींबरोबर महाजन याने लग्न करुन तिच्याबरोबर संसार करु लागला होता.
पोलीस जेव्हा त्याच्यापर्यंत पोहचले. तेव्हा त्याच्या पत्नीला हा सर्व प्रकार समजला.
या महिलेने आपल्यासोबत देखील असा काही प्रकार झाला आहे का याची पडताळणी केली.
तेव्हा त्याने फिर्यादी यांचे नावाने एकूण १६ लाख ४२ हजार ५५८ रुपयांचे कर्ज काढून त्यांचीही फसवणूक केल्याचे लक्षात आले.
त्यांनी फसवणुकीबरोबरच मानसिक छळ झाल्याची तक्रार केली असून पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराबरोबरच फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title : –  Pune Crime | Even married wife was cheated by thug Shantanu 16 lakhs mutual loan taken in the name of wife

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

 

 

Related Posts