IMPIMP

Pune Crime | खळबळजनक ! पुणे पोलिस आयुक्तालयात एकाने पेटवून घेत केला आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर जखमी

by nagesh
Pune Crime | murder in fursungi area hadapsar police arrest one

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शहर पोलिस आयुक्तालयाच्या (police commissionerate) गेटवरच एकाने पेटवून घेत आयुक्तालयाच्या आत धाव घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना आज (बुधवार) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. गेटवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी तसेच गुन्हे शाखेतील पोलिसांनी संबंधितास अडवून तात्काळ ससून हॉस्पीटलमध्ये (sasoon hospital) दाखल केल्याची माहिती मिळत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

शहर पोलिस आयुक्तालयाच्या (police commissionerate) जवळपास सर्वच गेटवर कडक बंदोबस्त असतो. गेटवरील रजिस्टरमध्ये नाव नोंदणी तसेच कामासंदर्भात आणि कोणाला भेटावयाचे आहे याची नोंद करावी लागते. त्यानंतरच संबंधितास आयुक्तालयात सोडले जाते. दरम्यान, बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास एकजण गेटसमोर आला. त्याने स्वतःला पेटवून घेतले आणि आतमध्ये पळत जाण्याचा प्रयत्न केला.

ही घटना पाहून एकंदरीत गेटवर गोंधळ उडाला. बंदोबस्तास असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांनी आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी त्यास अडवले आणि आग विझवली. त्यास तात्काळ ससून हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पेटवून घेतल्याने ती व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. दरम्यान, बंडगार्डन पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी आणि ससून रूग्णालयात धाव घेतली आहे. सुरेश विठ्ठल पिंगळे (रा. खडकी) असे जखमी झालेल्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. त्याने अंगावर रॉकेल ओतुन पेटवून घेतले होते. पिंगळेने अशा पध्दतीचे कृत्य का केले याबाबतची माहिती घेतली जात आहे.

 

Web Title : Pune Crime | Exciting! Attempted suicide by setting fire to Pune Police Commissionerate, seriously injured

 

हे देखील वाचा :

Honey Trap Racket Pune | धक्कादायक ! निवृत्त एअर फोर्स अधिकार्‍याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून लुटण्याचा प्रयत्न; विमानतळ पोलिसांकडून तिघांना अटक

MNS Vs Sambhaji Brigade | मनसे-संभाजी ब्रिगेड आमने-सामने, राज ठाकरेंना दिलं चर्चेच निमंत्रण

Anil Deshmukh | ईडीकडून अनिल देशमुखांना पुन्हा समन्स; उपस्थित न राहिल्यास ‘लूक आऊट’ची शक्यता

Supreme Court | पत्नीला घटस्फोट देऊ शकता, मुलांना नाही; 4 कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिले आदेश

 

Related Posts