IMPIMP

Pune Crime | सिक्युरिटी गार्डच्या पगारातील निम्मे पैसे हडपणार्‍या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल; कामगारांच्या प्रयत्नानंतर तब्बल 4 महिन्यांनी गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | सिमला ऑफीस (Simla Office) येथील हवामान विभागात (Indian Meteorological
Department) सिक्युरिटी गार्ड (Security Guard) म्हणून नोकरीला ठेवलेल्या सुरक्षा रक्षकांच्या पगारातील (Salary) निम्मा पगार हडप करणार्‍या
मेसर्स ईशा प्रोटेक्शनल सिक्युरिटी प्रा. लि. (Messrs Isha Protective Security Pvt. Ltd.) या कंपनीच्या फिल्ड ऑफिसरवर (Field Officer) अखेर
गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) करण्यात आला आहे.

 

राजेंद्र तानाजी काटकर Rajendra Tanaji Katkar (रा. जय जवान नगर, येरवडा – Yerwada) असे या अधिकार्‍याचे नाव आहे. याप्रकरणी विशाल
खिलारे Vishal Khilare (वय ३४, रा. बावधन, ता. मुळशी – Mulshi) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद (गु. रजि. नं.
१८०/२२) दिली आहे. हा प्रकार खडकी बाजार (Khadki Bazaar) येथील निता अपार्टमेंटमध्ये (Nita Apartment, Pune) असलेल्या मेसर्स ईशा
प्रोटेक्शनल सिक्युरिटी प्रा. लि. या कंपनीत १ नोव्हेबर २०२१ ते १ फेब्रुवारी २०२२ दरम्यान घडला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेसर्स ईशा प्रोटेक्शनल सिक्युरिटी प्रा. लि. या कंपनीला शिवाजीनगर (Shivajinagar) येथील भारतीय हवामान विभागामध्ये (Indian Meteorological Department) सुरक्षा रक्षक पुरविण्याचे काम मिळाले आहे. त्या कंपनीत राजेंद्र काटकर हे फिल्ड ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांनी हवामान विभागात सुरक्षा रक्षक म्हणून काही जणांना कामावर ठेवले. फिर्यादी व इतर कामगारांच्या नावे वैश्य बँकेच्या कोथरुड शाखेत (Vaishya Bank, Kothrud Branch) बँक खाते उघडले. त्यांच्या नावाचे या बँक खात्याचे एटीएम कार्ड स्वत:जवळ ठेवले. या एटीएम कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी या कामगारांच्या नावाने सिम कार्ड चालू करुन त्यांच्या नावे घेतलेल्या मोबाईलमध्ये या कार्डाचा परस्पर वापर केला. या कामगारांना दर महा २० हजार रुपये पगार होत होता. तो पगार त्यांच्या या नवीन बँक खात्यात भारतीय हवामान खात्यामार्फत जमा केला जात होता. (Pune Crime)

 

राजेंद्र काटकर हा त्यांचा पगार जमा झाला की त्यांच्या नावे काढलेल्या एटीएम कार्डचा वापर करुन त्यांचा पगार काढून घेत असे.
त्यापैकी १३ ते १४ हजार रुपये कामगारांना रोख स्वरुपात देऊन बाकी रक्कम हडप करीत असे.
ही बाब विशाल खिलारे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हवामान विभागाकडे तक्रार केली.
त्यांनी सुरुवातीला याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी कामगार आयुक्तालयाकडे (Commissionerate Of Labor) तक्रार करण्यास सांगितले.
कामगार आयुक्तालयात खिलारे यांनी अनेकदा अर्ज विनंत्या केल्या.
तरीही त्यांनी काही दाद लागू दिली नाही. त्यांनी काहीही कारवाई न करता पोलिसांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला.
शेवटी खिलारे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर आता ४ महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक कदम (Assistant Police Inspector Kadam) तपास करीत आहेत.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Filing a case against an officer for embezzling half of a security guards salary The case was registered 4 months after the efforts of the workers

 

हे देखील वाचा :

Pune Rain | पावसाची धुवाँधार बॅटिंग ; खडकवासला धरणातून २ हजार ५६८ क्युसेक पाणी नदीत सोडले, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

Shivsena Uddhav Thackeray | शिवसेनेला मोठा धक्का? मातोश्रीवरील बैठकीला लोकसभेतील 7 खासदारांची दांडी

Aditya Thackeray – Aarey Protest | राष्ट्रीय बाल हक्क आयोगाची मुंबई पोलिसांना नोटीस ! आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करा

 

Related Posts