IMPIMP

Pune Crime | 7 टक्के व्याजाने पैसे उकळणाऱ्या तोलगेकर ज्वेलर्सच्या मालकावर गुन्हे शाखेकडून FIR

by nagesh
Pune Crime | Action taken against moneylenders in Rasta Peth who charge a fine of 15000 per day for defaulting on interest installments of Rs 5 lakh

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | दरमहा 7 टक्क्याने व्याज वसुल केल्यानंतरही आणखी पैशांची मागणी करणाऱ्या पुण्यातील
तोलगेकर ज्वेलर्सचे (Tolgekkar Jewellers) मालक प्रशांत सुरेश तोलगेकर (Prashant Suresh Tolgekar) याच्यावर गुन्हे शाखेच्या (Crime
Branch) खंडणी विरोधी पथक दोनने (Anti Extortion Cell) कारवाई केली आहे. प्रशांत तोलगेकर याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात
(Sinhagad Road Police Station) गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

हिंगणे खुर्द येथील फिर्यादी यांना कौटुंबिक कारणांसाठी पैशांची गरज असल्याने त्यांनी तोलगेकर ज्वेलर्सचे मालक प्रशांत तोलगेकर (रा. हिंगणे खुर्द) यांच्याकडून 20 ऑक्टोबर 2020 रोजी पैसे घेतले होते. यासाठी फिर्यादी यांनी त्यांची स्वीफ्ट डिझायर गाडीचे कागदपत्रे व त्यांच्या फ्लॅटचे पेपर गहाण ठेवले होते. प्रशांत तोलगेकर याने फिर्यादी यांना दरमहा 7 टक्के व्याजाने (Interest) 3 लाख 50 हजार रुपये दिले. या मोबदल्यात फिर्यादी यांनी 87 हजार रुपये व्याज दिले. (Pune Crime)

 

फिर्यादी यांनी व्यवहारापोटी 4 लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र आरोपीने जास्त पैशांची मागणी केली. आरोपीने फिर्यादी यांच्याकडे 7 लाख रुपये मागितले. याबाबत फिर्यादी यांनी खंडणी विरोधी पथक दोन कडे तक्रार अर्ज केला होता. तक्रार अर्जावरुन खासगी सावकार (Private Moneylender) प्रशांत तोलगेकर याच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात आयपीसी 385, महाराष्ट्र सावकारी अधिनियमांतर्गत (Maharashtra Lenders Act) गुन्हा (FIR) दाखल केला. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णीक (Jt CP Joint Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – 2 चे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे (Police Inspector Balaji Pandhare),
सहायक पोलीस निरीक्षक चांगदेव सजगणे (API Changdev Sajagane),
पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण (PSI Shrikant Chavan),
पोलीस अंमलदार विजय गुरव, शैलेश सुर्वे, प्रदिप शितोळे, विनोद साळुंके, राहुल उत्तरकर, अनिल मेंगडे, अमोल पिलाने, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सैदाबा भोजराव, चेतन शिरोळकर, चेतन आपटे, प्रदिप गाडे, किशोर बर्गे, पवन भोसले, रवि संकपाळ, रुपाली कर्णवर, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title : – Pune Crime | FIR by pune police Crime Branch against the owner of Tolgekkar Jewellers who extorted money at 7 percent interest

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Prices | चांदी झाली 4000 रुपये स्वस्त, सोने सुद्धा जुलैमध्ये खुपच कमी दरात

Ramdas Kadam | रामदास कदमांची घणाघाती टीका; म्हणाले – ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’

Pune Crime | गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

 

Related Posts