IMPIMP

Gold-Silver Prices | चांदी झाली 4000 रुपये स्वस्त, सोने सुद्धा जुलैमध्ये खुपच कमी दरात

by nagesh
Gold-Silver Prices | gold prices today falls for consecutive third days now 5000 inr cheaper silver rate declines by 4000 rupees

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold-Silver Prices | जागतिक आर्थिक मंदीची (Global Recession) भीती असतानाही गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात (Gold Prices) घसरण सुरूच आहे. साधारणत: जेव्हा मंदीची शक्यता असते आणि युद्धाची परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोन्यासह इतर मौल्यवान धातूंच्या किमती वाढतात. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे कारण यूएसमधील बाँड यील्ड (US Bond Yield) वाढत आहे आणि इतर प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर (USD) मजबूत होत आहे. सध्याच्या परिस्थितीत, सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार अमेरिकन डॉलर घेत आहेत, त्यामुळे सोन्याचे नुकसान होत आहे. (Gold-Silver Prices)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याशिवाय देशांतर्गत पातळीवर मागणी कमी झाल्यानेही सोने कमजोर होत आहे. या कारणांमुळे गेल्या चार महिन्यांत सोन्याचा भाव 5000 रुपयांनी घसरला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दरही 4000 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

 

ग्लोबल मार्केटमध्ये मिळू लागला सपोर्ट
जागतिक बाजारात, स्पॉट मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव (US Gold Spot Prices) 0.05 टक्क्यांनी घसरून 1,716.12 प्रति औंस झाला. अमेरिकेतील गोल्ड फ्युचरची किंमतही आज घसरली. सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही झपाट्याने घसरण होत आहे. जागतिक बाजारात, स्पॉट सिल्व्हरची किंमत (US Gold Future Prices) 0.16 टक्क्यांनी घसरून 18.57 डॉलर प्रति औंस झाली. (Gold-Silver Prices)

 

प्लॅटिनमचे भाव (Platinum Prices) ही 0.36 टक्क्यांनी घसरून 870.50 डॉलर प्रति औंस झाले. मात्र, पॅलेडियम (Palladium Prices) च्या किमतीत किंचित वाढ झाली आणि त्याची किंमत 0.11 टक्क्यांनी वाढून 2,012.82 डॉलर प्रति औंस झाली. मौल्यवान धातूंना गेल्या काही सत्रांमध्ये मर्यादित आधार मिळाला आहे. फेडरल रिझर्व्हच्या दरवाढीबाबत गुंतवणूकदार सावध आहेत.

 

फेड रिझर्व्हच्या निर्णयावर ठरेल वाटचाल
गेल्या काही काळापासून अमेरिकन डॉलरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. डॉलर 20 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचण्याच्या जवळ आहे. त्याच वेळी, यूएसमध्ये ट्रेझरी यील्ड 10 वर्षांमध्ये सर्वात जास्त आहे. यामुळे सुरक्षित गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांसमोर चांगल्या रिटर्नचे पर्याय आहेत. सोन्यासह बहुतांश महागड्या धातूंच्या किमती घसरण्याचे हे सर्वात मोठे कारण आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

फेडरल रिझर्व्ह (Federal Reserve) ची व्याजदर वाढ याला आणखी हातभार लावत आहे. फेडरल रिझर्व्ह या आठवड्याच्या धोरण बैठकीत, एका झटक्यात 0.75 टक्के व्याजदर वाढवण्याची घोषणा करू शकते. 0.75 टक्के दरवाढ करण्यात शंका नाही, उलट फेडरल रिझर्व्ह एकाच वेळी 01 टक्क्यांनी दर वाढवू (Federal Reserve Rate Hike) शकते, असे विश्लेषक गृहीत धरत आहेत. फेडरल रिझर्व्हच्या या घोषणेनंतर सोन्या-चांदीच्या भावी वाटचालीचा अंदाज बांधता येईल.

 

मार्चमध्ये सोने 55 हजार रुपयांच्या पुढे होते
देशांतर्गत बाजाराबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सलग तिसर्‍या दिवशी सोन्याच्या किमतीत नरमाई दिसून येत आहे.
एमसीएक्स गोल्ड फ्युचर्स घसरणीसह 50,540 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेड करत आहे.
त्याचप्रमाणे चांदीचा भाव 0.3 टक्क्यांच्या घसरणीसह 54,540 रुपये प्रति किलोवर ट्रेड करत होता.

 

देशांतर्गत बाजारात या वर्षी मार्चच्या मध्यात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 55,200 रुपयांवर पोहोचला होता.
अशाप्रकारे सोने सध्या उच्च पातळीपेक्षा 4,660 रुपयांनी स्वस्त आहे.

 

सरकारने वाढवली आहे बेसिक इम्पोर्ट ड्यूटी
सरकारने अलीकडेच सोन्याच्या आयातीवरील बेसिक इम्पोर्ट ड्युटी (Basic Import Duty) 12.5 टक्के केली आहे.
यापूर्वी हा दर 7.5 टक्के होता. भारत हा सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे.
भारताला आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी सोने आयात करावे लागते.

 

कच्च्या तेलानंतर, सोने हा भारताच्या इम्पोर्ट बिलातील (Import Bill) सर्वात मोठा घटक आहे.
सोन्याची मागणी कमी करण्यासाठी सरकारने शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, जागतिक बाजारात किमती कमी झाल्याने भारतातही सोने स्वस्त होत आहे.
येत्या काही दिवसांत सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते, असे बाजारातील जाणकारांचे म्हणणे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Gold-Silver Prices | gold prices today falls for consecutive third days now 5000 inr cheaper silver rate declines by 4000 rupees

 

हे देखील वाचा :

Ramdas Kadam | रामदास कदमांची घणाघाती टीका; म्हणाले – ‘संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची घेतलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजर साक्षी’

Pune Crime | गजबजलेल्या ठिकाणी युवकाचा सपासप वार करुन खून, परिसरात खळबळ

Uddhav Thackeray Interview | शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली ? उद्धव ठाकरेचं भाजपकडे बोट

 

Related Posts