IMPIMP

Pune Crime | जामीनाची व्यवस्था न केल्याने गुंडाची तरुणाला रॉडने मारहाण

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | तुरुंगात असताना जामीनाची (Bail) व्यवस्था केली नाही, या रागातून एका गुंडाने (Criminal) तरुणाला लोखंडी रॉडने भर रस्त्यात मारहाण (Beating) करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to kill) केला. पोलिसांनी या गुंडाला पुन्हा अटक (Arrest) केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याची आता पुन्हा तुरुंगात रवानगी होणार आहे. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उमेश वसंत जंगम Umesh Vasant Jangam (वय ३०, रा. नारायण पेठ) असे या गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी सागर सुरेंद्र राठोड Sagar Surendra Rathod (वय २५, रा. बुधवार पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १९०/२२) दिली आहे. हा प्रकार सिटी पोस्ट ऑफिससमोरील गिरीजा बारबाहेरील फुटपाथवर १० ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेश जंगम हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड आहे.
तो जामीनावर सुटून आला आहे. फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत.
सिटी पोस्टसमोर ते दोघे भेटल्यानंतर उमेश जंगम याने फिर्यादी याला शिवीगाळ करुन मी जेलमध्ये असताना माझ्या जामीनाची व्यवस्था का केली नाही, असे म्हणून हाताने मारहाण केली.
तसेच लोखंडी रॉड डोक्यात मारुन गंभीर जखमी केले. मी इथला भाई आहे, असे म्हणून दहशत निर्माण केली.
पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक शेटे (Assistant Police Inspector Shete) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | For not arranging bail, the goon beat the youth with a rod Crime news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | ‘कमळ’ आणि ‘ढाल तलवार’ मिळून महाविकास आघाडीला अशी जागा दाखवू की…, चंद्रशेखर बावनकुळेंचा इशारा

Gulabrao Patil | ‘काही काम नाही झाले की सरकारवर बोट दाखवायचे एवढंच काम आता शिवसेनेला राहिले’, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

Pune Crime | नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटल्यानंतर तरुणाची आत्महत्या; सलग दुसर्‍या घटनेने खळबळ

 

Related Posts