IMPIMP

Gulabrao Patil | ‘काही काम नाही झाले की सरकारवर बोट दाखवायचे एवढंच काम आता शिवसेनेला राहिले’, ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

by nagesh
Maharashtra Political News | maharashtra minister gulabrao patil comment on ncp leader ajit pawar in jalgaon bjp govt

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन अंधेरी येथे विधानसभेच्या एका रिक्त जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीवर (Andheri East By-Election) राज्यातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके (Shivsena MLA Ramesh Latake) यांच्या पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. परंतु त्या महापालिका कर्मचारी असल्याने त्यांना अगोदर नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यासाठी त्यांनी राजीनामा आणि नियमाप्रमाणे एक महिन्याचे वेतन कोषागारात जमा केले आहे. तरी देखील त्यांच्या राजीनाम्याच्या कार्यवाहीला 30 दिवसांचा अवधी लागेल, असे महापालिका आयुक्त (Municipal Commissioner) इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांनी सांगितले आहे. त्यावर शिवसेनेने आक्षेप घेत आयुक्त दबावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. त्याला आता सेनेच्या बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ऋतुजा लटके यांचा राजीनामा नियमाप्रमाणेच मंजूर होईल, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांनी दिलेला राजीनामा नियमाप्रमाणे मंजूर करुन घेण्याचे काम पालिका व्यवस्थापनाचे आहे. त्यामुळे तो मंजूर केला जाईल. राजीनामा दिल्यानंतर त्यात मुख्यमंत्री किंवा मंत्री लक्ष घालतात, असे कुठे असते का? राजीनामा मंजूर करण्याची एक प्रक्रिया असते. प्रोसेसमध्ये काही नियम असतात, त्यानुसार त्यावर कार्यवाही केली जाते. काही काम नाही झाले की सरकारवर बोट दाखवायचे एवढंच काम आता शिवसेनेला राहिले आहे, दुसरे काही काम राहिले नाही, असे गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले.

 

दरम्यान, आयुक्तांनी राजीनामा स्वीकारला असून त्याला 30 दिवसांचा अवधी दिला आहे.
ऋतुजा लटके यांचा राजीनामा तात्काळ मान्य करण्यात आला नसल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
त्यामुळे आता शिवसेना मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेणार हे निश्चित झाले आहे.

 

 

Web Title :- Gulabrao Patil | rankandan over resignation shinde groups response to thackeray groups allegations gulabrao patil said

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन लुटल्यानंतर तरुणाची आत्महत्या; सलग दुसर्‍या घटनेने खळबळ

Communist Party of India | वेगळ्या राजकारणाचे संकेत, लाल बावट्याचा भगव्याला पाठिंबा, ठाकरेंच्या खांद्याला खांदा लावून भाजपविरोधात लढणार!

Swachh Bharat Abhiyan | ऋतुजा भोसले, डॉ. सलील कुलकर्णी पुणे शहर ‘स्वच्छ सर्वेक्षण 2023’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

T20 World Cup | टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहच्या नंतर हा प्रमुख गोलंदाज विश्वचषकातुन बाहेर

 

Related Posts