IMPIMP

Pune Crime | शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर, API मोहिते यांच्यासह २० जणांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली गुन्हा दाखल

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | भारत बंदच्या दरम्यान स्टॉल उघडा असल्याने दुकानातील साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर (Former Shivsena MLA Mahadev Babar) व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याची तक्रार देण्यासाठी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गेल्यावर त्यांची तक्रार न घेता त्यांना हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी महादेव बाबर, पोलीस निरीक्षक जानकर (Police Inspector Jankar) यांच्यासह २० जणांवर अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्टखाली (Atrocity Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी कोंढवा येथील एका ३४ वर्षाच्या नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. ६९३/२२) दिली आहे. ही घटना १० ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता ते ११ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान कोंढवा येथील कोर्णाक पुरम सोसायटीबाहेर (Konark Puram, Kondhwa) व पोलीस ठाण्यात घडला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी न्यायालयाने सीआरपीसी १५६(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

नारायण लोणकर, महादेव बाबर, अब्दुल बागवान, अस्लम बागवान, राजेंद्र बाबर, दीपक रमाणी, सईद शेख, राजू सय्यद, पोलीस निरीक्षक जानकर, सहायक पोलीस निरीक्षक मोहिते (API Mohite) , सहायक फौजदार कामथे, हवालदार गरुड, पोलीस शिपाई नदाफ, सुब्बनवाड, महिाला पोलीस शिपाई सुरेखा बडे व इतर ४ ते ५ जण अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

शिवसेनेच्या वतीने भारत बंदचे आयोजन करण्यात आले होते. फिर्यादी यांच्या बहिणीचा स्टाल उघडा असल्याने तो स्टॉल बंद करण्यासाठी शिवसेनेचे कार्यकर्ते आले होते.
महादेव बाबर व अब्दुल बागवान यांनी त्यांच्या दुकानातील सामान, साहित्य रस्त्यावर फेकून देऊन जातीवाचक शिवीगाळ केली.
तू खालच्या जातीचा असून तुला रुबाब आला का असे म्हणून सर्वांनी हाताने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी हे कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असताना पोलीस निरीक्षक जानकर व
इतरांनी त्यांची तक्रार न घेता हाताने मारहाण केली.
अशी तक्रार फिर्यादी यांनी न्यायालयात केली होती.
त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करुन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Former Shiv Sena MLA Mahadev Babar, Inspector of Police Jankar, API Mohite and 20 others have been charged under the Atrocities Act

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | ठाण्यातील शिवसेनेचे 66 नगरसेवक एकनाथ शिंदे गटात सामिल

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून विश्रांतवाडीत दांडेकर पुलावरील तुषार भोसलेचा खून

Shivsena MP Sanjay Raut | संजय राऊतांचा बंडखोर आमदारांना टोला; म्हणाले – ‘तुम्ही नेमके का गेलात, ते एकदाचे ठरवा, गोंधळू नका’

 

Related Posts