IMPIMP

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून गुंडाच्या खूनप्रकरणी चौघांना अटक; खून झालेल्या गुंडाच्या साथीदारांवरही खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | विश्रांतवाडी (Vishrantwadi) येथे पूर्ववैमनस्यातून गुंडावर चाकूने भोसकून खून (Murder In Pune) केल्या प्रकरणी पोलिसांनी (Pune Police) चौघांना अटक (Arrest) केली आहे. तर खून झालेल्या गुंडाच्या साथीदारांवरही खूनाचा प्रयत्न (Attempted Murder) केल्याचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

बाळू अर्जुन शिंदे Balu Arjun Shinde (वय 42), फ्रांसिस स्वामी उर्फ भैय्या अँथनी स्वामी Francis Swami alias Bhaiya Anthony Swami (वय 20, दोघे हि रा. सन. 112, विश्रांतवाडी), सरफराज सलीम शेख उर्फ गोल्या Sarfaraz Salim Sheikh alias Golya (वय 20, रा. विठ्ठल मंदिर मागे धानोरी), अकबर शहाबुद्दीन शेख Akbar Shahabuddin Sheikh (वय 20, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तुषार जयवंत भोसले Tushar Jaywant Bhosale (वय 23, रा. दांडेकर पुल-Dandekar Bridge) असे खून झालेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार याचे फ्रान्सेस स्वामी उर्फ भैय्या याच्यासोबत पूर्वी काही कारणावरून वाद झाले होते. बुधवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तुषार वडारवस्ती येथे आला होता. याठिकाणी तुषार व भैय्या यांच्यात पुन्हा शिवीगाळ वादावादी झाली. त्यानंतर तुषार याने त्याच्या पत्राचाळ विश्रांतवाडी व जनता वसाहत दत्तवाडी येथील साथीदारांना विश्रांतवाडी येथील वडार वस्तीत बोलावून घेतले. येथे आल्यानंतर ते भैय्या याचा वस्तीत शोध घेऊ लागले.

 

भैय्या याचा मित्र बाळू शिंदे यांच्या घरात गेल्यानंतर बाळूने तुषार याला हातातील चाकुने पोटात व छातीत वार केले. तर त्याचे इतर साथीदार भैय्या, सरफराज व अकबर यांनी लाकडी बांबू रोड व सत्तुर घेऊन पाठलाग करत मारहाण व दगडफेक करण्यास सुरुवात केली. बाळू याने तुषार याच्यावर चाकूने वार केल्यामुळे गंभीर जखमी झाला. तुषार याचा भाऊ आदित्य व त्याच्या इतर साथीदारांनी त्याला आधी खासगी रुग्णालयात व नंतर ससून रुग्णालय (Sassoon Hospital) येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणी पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी (Vishrantwadi Police Station) तुषार भोसले याच्या खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौघा आरोपींना तात्काळ अटक केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याच प्रकरणात आणखी एक खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत फ्रान्सिसी अ‍ॅत्थनी स्वामी (वय 19, रा. वडारवस्ती, विश्रांतवाडी) याने फिर्याद दिली आहे.
त्यावरुन तुषार भोसले, परशुराम माणिके (Parashuram Manike), सागर गवळी (Sagar Gawli),
गौरव कदम (Gaurav Kadam), अकबर शेख (Akbar Sheikh), व्यंकटेश (Venkatesh) व तेथील 10 ते 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परशुराम माणिके व सागर गवळी यांना अटक करण्यात आली आहे.

 

स्वामी व तुषार भोसले याच्यात गाडीला कट मारण्याच्या करणावरुन झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तुषार भोसले हा वस्तीत आला होता.
फिर्यादीला पाहून बघुन घेण्याची धमकी दिली.
त्याच्या साथीदारांनी पालघन,कोयता अशी हत्यारे घेऊन वस्तीत येऊन दहशत निर्माण करुन बाळु शिंदे याला मारहाण केली.
गोलु ऊर्फ सर्फराज याच्यावर तुषार भोसले याने पालघन डोक्यात मारण्याचा प्रयत्न करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला.
पोलीस उपनिरीक्षक सातपुते (PSI Satpute) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Four arrested in premeditated hooligan murder case; Accused of attempted murder was also charged against the accomplices of the murdered gangster

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ’धनुष्यबाण’ हातातून जाण्याची शक्यता; शिवसेना खासदार संजय राऊतांचे सूचक ट्विट

CM Eknath Shinde | CM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना होणार, खातेवाटपावर चर्चा?

Maharashtra Congress | काँग्रेसनं मोठा निर्णय घेतल्यानं शिवसेनेला मोठा धक्का ?

 

Related Posts