IMPIMP

Pune Crime | खडकवासला येथील केंद्रीय विद्यालयाच्या निवृत्त प्राचार्यासह चौघांवर गुन्हा दाखल; अ‍ॅडमिशन देण्याच्या नावाखाली उकळले 17 लाख

by nagesh
Pune Crime | 48 lakhs fraud of the company by cross-selling water purifier material; Type at Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | खडकवासला (khadakwasla ) येथील डि आय टी गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात (Kendriya Vidyalaya D.I.A.T. Girinagar, Pune, Sinhgad Road, Pune, Maharashtra) प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून लोकांकडून तब्बल १७ लाख ६० रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी निवृत्त प्राचार्य व त्यांच्या मुलासह चौघांवर हवेली पोलिसांनी गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

प्रदीप सद्य सांगोले आणि त्यांचा मुलगा शुभम प्रदीप सांगोले (रा. गजानन कॉलनी, गोंदिया), अनंता मधुकर लायगुडे (रा. गोर्‍हे खुर्द, ता. हवेली) आणि विठ्ठल श्रीरंग थोपटे (रा. खानापूर, ता. हवेली) अशी गुन्हा (Pune Crime) दाखल झालेल्यांची नावे आहेत.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी निलेश रमेश राऊत (वय ४१, रा. गोर्‍हे बुद्रुक, ता. हवेली) यांनी हवेली पोलीस ठाण्यात ( गु. र. नं. २३४/२१) फिर्याद दिली आहे.
निलेश राऊत हे लष्करातून सेवा निवृत्त झाले असून सध्या गोर्‍हे बुद्रुक येथे व्यवसाय करतात.
तर प्रदीप सांगोले हे गिरीनगर येथील केंद्रीय विद्यालयात प्राचार्य होते.
प्राचार्य व त्यांचा मुलगा शुभम यांनी अनंता लायगुडे व विठ्ठल थोपटे यांच्या मदतीने मुलांना केंद्रीय विद्यालयात प्रवेश मिळवून देतो, असे सांगून लोकांकडून पैसे उकळले.
निलेश राऊत यांच्या मुलाला प्रवेश मिळवून देण्यासाठी २० एप्रिल २०२१ रोजी ९० हजार रुपये घेतले.
याशिवाय इतरांकडून एकूण १७ लाख ६० हजार रुपये घेतले.
हे पैसे घेतल्यानंतर प्रदीप सांगोले हे सेवानिवृत्त झाले.
त्यांनी मुलांचे अ‍ॅडमिशन करुन दिले नाही.
फिर्यादी व इतरांनी पैसे परत मागितल्यावर पैसे परत न करता त्यांची फसवणूक केली.
पैसे परत देत नसल्याचे आता लोकांनी पोलिसांकडे फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे (API Niranjan Ranavare) अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | Four persons, including a retired principal of Kendriya Vidyalaya at Khadakwasla, have been booked; 17 lakh boiled under the guise of giving admission

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | ‘2024 पर्यंत शिवसेना देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी’ – संजय राऊत

Sanjay Raut | ‘उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर शस्त्र कधी आणि कोणासाठी काढायची…’; संजय राऊतांचा सूचक इशारा

Pune News | राष्ट्रवादी भाजपला विचारणार ‘क्या हुआ तेरा वादा’?*

Akola Crime | स्टिंग ऑपरेशनमुळं प्रसिध्द डॉक्टरचा ‘पर्दाफाश’ ! पुरुष रुग्णासोबत केला अनैसर्गिक संभोग; अकोल्यात प्रचंड खळबळ

 

Related Posts