IMPIMP

Pune Crime | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू; वानवडी परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime Ganesh Pundalik Patole drowned while swimming water of Bapusaheb Kedari Swimming Pool Wanwadi pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाचा जलतरण तलावाच्या पाण्यात बुडून (Drowned) मृत्यू (Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी (दि.20) दुपारी दोनच्या सुमारास पुण्यातील (Pune Crime) वानवडी येथील बापूसाहेब केदारी जलतरण तलावात (Bapusaheb Kedari Swimming Pool Wanwadi) घडली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गणेश पुंडलीक पाटोळे Ganesh Pundalik Patole (वय – 17 रा. गल्ली क्रमांक 7, सरवदे वस्ती मागे, साठे नगर, महमदवाडी – Mahmadwadi) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गणेश व त्याचे मित्र रेहान, अजय असे तिघेजण रविवारी दुपारी वानवडीतील शिवरकर मार्गावर असलेल्या महापालिकेच्या (Municipal Corporation) जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. रेहानला पोहता येत नसल्याने काहीवेळ तो पाण्यात थांबून बाहेर आला. तर अजय आणि गणेश हे नव्यानेच पोहायला शिकल्याने ते खोल पाण्यात उतरून पोहत होते. (Pune Crime)

 

दरम्यान, जलतरण तलावातील पाणी गढूळ झाल्याने अजयला त्रास होऊ लागल्याने तो बाहेर आला. त्याने कपडे घातले. बराचवेळ झाला तरी गणेश पाण्याबाहेर आला नाही. त्याचा जलतरण तलावात शोध घेऊनही आढळला नाही. त्यामुळे अजय आणि रेहान यांनी तातडीने तेथील जीवरक्षकांना (Lifeguard) याबाबत सांगितले. त्यांनी काही वेळाने जलतरण तलावामध्ये शोध घेतला. त्यांनाही गणेश आढळून आला नाही.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

अखेर गणेशचा शोध घेण्यासाठी तलावातील पाणी कमी करण्यात आले.
त्यावेळी गणेश पाण्यामध्ये बुडाल्याचे दिसून आले. अजय, रेहान व जीवरक्षकांनी त्याच्यावर प्रथमोपचार करुन त्याला तातडीने रुग्णालयात नेले.
डॉक्टरांनी गणेशला तपासून उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले.

 

 

Web Title :- Pune Crime Ganesh Pundalik Patole drowned while swimming water of Bapusaheb Kedari Swimming Pool Wanwadi pune

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | शिवसेनेला ‘जनाब सेना’ म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीसांचा ‘तो’ फोटो सोशलवर तुफान व्हायरल

Aamir Khan on The Kashmir Files | ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर आमिर खाननं मांडलं मत; म्हणाला – ‘जे कश्मीरी पंडितांसोबत झालं, ते…’

Uddhav Thackeray | हिंदुत्वाच्या मुद्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर पलटवार, म्हणाले…

 

Related Posts