IMPIMP

Pune Crime | पुण्याच्या गुलटेकडी परिसरात गुंडांचा हैदोस ! तरुणावर तलवार, कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | Thieves attack DSK Dreamcity security guards in Pune!

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | मोटारसायकल अंगावर घातली म्हणून जाब विचारल्याने गुंडाच्या टोळक्याने तरुणाच्या वाहनाची तोडफोड करुन तलवार, कोयत्याने वार करुन तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी (swargate police)  6 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

याबाबत राम राजू उमाप (वय 25, रा. अण्णाभाऊ साठेनगर, अरण्येश्वर, सहकारनगर) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अक्रम शेख, अन्वर ऊर्फ जम्ब्या शेख, शाहरुख शेख, ओंकार पवार, अमित शेकापूर, इमात शेख (सर्व रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

राम उमाप हे रविवारी  आपल्या बहिणीकडे राखी बांधण्यासाठी चालले असताना अन्वर शेखने उमाप यांच्या अंगावर मोटारसायकल घातली. फिर्यादी यांनी त्याचा जाब विचारला असता आरोपीने शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजता फिर्यादी यांच्या घराजवळ जाऊन गोंधळ घालून त्यांच्या दुचाकीचा आरसा फोडून नुकसान केले. या प्रकारावर न थांबता टोळक्याने फिर्यादी हे सोमवारी दुपारी २ वाजता वडिलांचे घरी जात असताना गिरीधर भवन चौकात  अक्रम शेख याने विनाकारण लाथ मारली. त्याचा फिर्यादीने जाब विचारल्यावर सर्व  टोळक्याने येऊन फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केला. शाहरुख शेख याने त्याच्याकडील तलवारीने फिर्यादीचे मित्र गोविंद याच्या पोटात घुसवून त्यांना जबर जखमी केले. अमित शेकापूर याने फिर्यादी यांना बांबुने मारहाण केली. आजू बाजूच्या लोकांनी मदतीला येऊ नये, म्हणून या टोळक्याने  तलवारी, कोयते, पालघन व बांबु घेऊन परिसरात दहशत माजविली. स्वारगेट पोलीस तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Goons’ haidos in Pune’s Gultekdi area! Attempt to kill a young man with a sword and a scythe

 

हे देखील वाचा :

Delta Plus Variant | मुंबईत 128 नमून्यांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळला, महाराष्ट्रात डेल्टा प्लसची 27 नवीन प्रकरणे

फायद्याची गोष्ट ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीत घरी घेऊन जा Honda Jazz, पसंत न आल्यास कंपनीला द्या परत

Dahi Handi | राज्यात जन्माष्टमीला दहीहंडीची परवानगी नाही, कडक नियमांच्या आणि निर्बंधांच्या कक्षेत साजरा केला जाईल गणेशोत्सव; जाणून घ्या

 

Related Posts