IMPIMP

Pune Crime | हॉटेल मॅनेजरसह इतर 15 जणांकडून ग्राहकांना मारहाण, पुण्याच्या कोथरूड परिसरातील हॉटेल स्पाईस गार्डनमधील घटना

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या वडिलांना व त्यांच्या मित्रांना हॉटेल मॅनेजर व इतर कामगारांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हॉटेलमधून हाकलून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोथरुडमध्ये (Kothrud News) राहणार्‍या एका ३६ वर्षाच्या पालकाने कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली (Pune Crime) आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यानुसार पोलिसांनी हॉटेल स्पाईस गार्डनचे (Spice Garden, Kothrud) मॅनेजर विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर हॉटेलमधील
१३ ते १५ कामगारांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार किष्किंदानगर (kishkinda nagar kothrud) येथील हॉटेल स्पाईस गार्डनमध्ये २५ डिसेंबर
रोजी रात्री पावणेबारा वाजता घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉटेल स्पाईस गार्डन येथे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर व सर्व पाहुणे गेल्यानंतर फिर्यादी त्यांच्या मित्रासोबत जेवण करीत होते. त्यावेळी हॉटेलचा मॅनेजर विनय शेट्टी तेथे आला व त्याने फिर्यादीकडे बघून खूप उशीर झाला, यांचे जेवण कधी होणार, पैसे देणार की नाही, असे फिर्यादी यांना टोमणे मारले. फिर्यादी यांचे जेवण झाल्यावर त्यांनी गुगल-पेद्वारे (Google Pay) पैसे ट्रान्सफर केले.

परंतु पैसे ट्रान्सफर न झाल्याने विनय शेट्टी व हॉटेलमधील कॅप्टन दयानंद, सचिन व इतर कामगारांनी फिर्यादी यांना फुकटे आहेत, असे म्हणून त्यांना व त्यांच्या दोघा मित्रांना लाथाबुक्क्यांनी मारहाण (Pune Crime) करुन हॉटेलमधून बाहेर हाकलून दिले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक राठोड (PSI Rathod) अधिक तपास करीत आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | खूशखबर ! वर्षाच्या अखेरीस सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचा भाव

Pune Crime | पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस ! कोयत्याने वार करुन तरुणाच्या खूनाचा प्रयत्न, येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना

Mayor Murlidhar Mohol | 15 ते 18 वयोगटासाठी पुणे शहरात 5 लसीकरण केंद्रे, महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

 

Related Posts