IMPIMP

Pune Crime | कारमध्ये गावठी दारुचा बेकायदा साठा, महिलेसह दोघांना अटक

by nagesh
Pune Crime | Illegal stock of liquor in car, two arrested along with woman

पुणे (Pune): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)Pune Crime | घरात आणि कारमध्ये गावठी दारुचा (Liquor) बेकायदेशीरपणे साठा करणाऱ्या एका महिलेसह दोघांना राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने (State Excise) अटक (Pune Crime) केली. दारुचे 60 प्लॅस्टिक कॅन असा एकूण अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पुण्यातील (Pune Crime) बावधन बुद्रुक (Bavadhan Budruk) येथे गुरुवारी (दि.5) करण्यात आली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

विवेक मुकुटसिंग रजपूत (वय-41 रा. बावधन बुद्रुक), बिंदीया अनिल राजपुत (वय-46 रा. बावधन बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींचे नाव आहे. त्यांच्याविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस.जे. डेरे (State Excise Department Inspector S.J. Dere) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

गटारी आमावस्याच्या पार्श्वभूमीवर अवैध गावठी दारुचा बेकायदेशीरपणे साठा केल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार, गुरुवारी पथकाने बावधन बुद्रुक येथील त्रिशा बंगल्यावर छापा टाकला. त्यावेळी बंगल्यामध्ये 35 लिटरचे 30 कॅन, तर बंगल्याच्या आवारतच पार्किंग केलेल्या सँट्रो कारमध्ये (एमएच 14 एक्स 7444) प्लॅस्टिकचे 10 कॅन असा एकूण 1 लाख 18 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दरम्यान, बावधन बुद्रुक येथील भुंडे वस्ती परिसरातील बिंदीया राजपुत हिच्याही घरावर पथकाने छापा घातला. घरातून 15 कॅन व अल्टो कारमधून (एमएच 12 एलजे 1279) 5 कॅन असा एकूण 1 लाख 22 हजार 750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे (Divisional Deputy Commissioner of State Excise Prasad Surve),
अधीक्षक संतोष झगडे (Superintendent Santosh Zagde),
उपअधीक्षक संजय आर. पाटील (Deputy Superintendent Sanjay R. Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, निरीक्षक राजाराम शेवाळे,
उपनिरीक्षक तानाजी शिंदे, गणेश केंद्रे, रोहिदास मासाळकर, समीर पडवळ, दत्तात्रय पिलावरे, शरद भोर,
वाहनचालक दत्तात्रय आबनावे, निलम पिंगळे, शाईन इनामदार, शामल धुमक यांच्या पथकाने केली.

 

 

Web Title : Pune Crime | Illegal stock of liquor in car, two arrested along with woman

 

हे देखील वाचा :

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 228 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

IAF Recruitment 2021 | ‘या’ उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; भारतीय हवाई दलात होणार भरती

Modi Government | भारतातून चोरीला गेलेला 75 % वारसा मोदी सरकारच्या 7 वर्षात परत आला – जी किशन रेड्डी

 

Related Posts