IMPIMP

Pune Crime | पिण्यासाठी पाणी न दिल्याने सलून मालकावर कोयत्याने वार, आंबेगाव खुर्द येथील घटना

by nagesh
Pune Crime News | Hand broken by juvenile gang after stabbing it with a coyote; A shocking incident in Katraj after reporting to the police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | पिण्यासाठी पाण्याची (Drinking Water) बॉटल मागितली असता पाणी देण्यास नकार दिल्याच्या
रागातून तीन जणांनी एका सलून मालकावर (Salon Owner) कोयत्याने वार केले. हा प्रकार (Pune Crime) आंबेगाव खुर्द (Ambegaon Khurd)
येथील ‘शिवस्व मेन्स पार्लर’ समोर रविवारी (दि.11) रात्री पावणे अकराच्या सुमारास घडला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

स्वप्नील पंढरीनाथ तावरे (वय-27 रा. जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) असे जखमी झालेल्या सलून मालकाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि.13) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharti Vidhyapeeth Police Station फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोन्या कांबळे, गोविंद लोखंडे (रा. शनिनगर) आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात आयपीसी 307, 323, 504, 34, आर्म अ‍ॅक्ट (Arms Act), महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे जांभुळवाडी रोडवर शिवस्व मेन्स पार्लर नावाचे दुकान आहे.
आरोपींनी त्यांच्या दुकानात येऊन पिण्यासाठी पाण्याची बॉटल मागितली.
त्यावेळी फिर्यादी यांनी दुकानात पाणी नाही असे सांगितल्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करुन धमकी दिली.
त्यानंतर फिर्यादी हे मेस मधून जेवणाचा डबा घेऊन दुकान आले.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर त्यांच्यासोबत आलेल्या एका अनोळखी व्यक्तीने कोयत्याने डोक्यात व गळ्यावर वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-Pune Crime | Incident at Ambegaon Khurd: Salon owner stabbed with a knife for not being given water to drink

 

हे देखील वाचा :

Shinde-Fadnavis Govt | ‘महाराष्ट्रात ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना मान्यता’ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ambadas Danve | बेळगाव सीमा वादाप्रमाणे मराठवाडा देलगुरचा प्रश्नावरही ठराव करावा; कामकाज सल्लागार समिती बैठकीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

Sushma Andhare On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांना शिवरायांबद्दल द्वेष, आकस; पुण्यात सुषमा अंधारेंचा घणाघात

Pune Crime | ऑनलाईन वाईन मागवणं तरुणीला पडलं महागात, सायबर गुन्हेगारांकडून 1 लाखाचा गंडा; येरवडा परिसरातील घटना

 

Related Posts