IMPIMP

Pune Crime | शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने 37 गुंतवणुकदारांना 4 कोटींना घातला गंडा; सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | Lure of investment in share market cheated 37 investors to the tune of 4 crores; A case has been registered at Sinhagad Road Police Station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | शेअर मार्केटमध्ये (Stock Market) पैसे गुंतविल्यास त्यावर दरमहा ५ टक्के दराने परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाने ३७ गुंतवणुकदारांना तब्बल ४ कोटी १० लाख ८३ हजार रुपयांना गंडा (Cheating Case) घातला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी नितीन वसंत अनासपुरे Nitin Vasant Anaspure (वय ५१, रा. सदाशिव पेठ – Sadashiv Peth) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३०५/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माधव कुमारील भागवत Madhav Kumaril Bhagwat (वय ५८, रा. शारदा हेरिटेज, सावित्रीनगर, हिंगणे खुर्द) याच्यावर गुन्हा (FIR) दाखल (Pune Crime) केला आहे. हा प्रकार सिंहगड रोडवरील आकांक्षा क्रिएशन्स (Akanksha Creations) येथे मे २०२१ ते जानेवारी २०२२ दरम्यान घडली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधव भागवत याने सिंहगड रोडवर कार्यालय सुरु केले. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास (Share Market Invest) त्यावर दरमहा ५ टक्के दराने परतावा मिळेल किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतविलेल्या रक्कमेवर मिळणार्‍या नफ्यामध्ये ६० टक्के गुंतवणुकदार याची आणि ४० टक्के त्यांची भागीदारी असे आमिष दाखविले. तसेच शैलजा कमर्शिअलमध्ये (Shailaja Commercial) १३५ दिवसांसाठी गुंतवणुक (Investment) केल्यास त्यावर दुप्पट रक्कम मिळेल, अशा योजना सांगून लोकांना गुंतवणुक करण्यास भाग पाडले.

 

या आमिषाला बळी पडून नितीन अनासपुरे यांनी त्यांची आई, सासरे यांच्या नावाने २ लाख रुपयांची गुंतवणुक केली.
त्यांच्यासह आणखी ३७ जणांनी अशाच प्रकारे ४ कोटी १० लाख ८३ हजार ७२५ रुपयांची गुंतवणुक केली.
त्यांना आजपर्यंत कोणतीही रक्कम परत न करता त्यांची फसवणुक (Froud Case) केली.
याची तक्रार मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) तपास करुन गुन्हा दाखल केला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक वैरागकर (Assistant Police Inspector Vairagkar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Lure of investment in share market cheated 37 investors to the tune of 4 crores; A case has been registered at Sinhagad Road Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 55 वर्षाच्या सुनेचा 80 वर्षाच्या सासर्‍यांकडून विनयभंग; प्रभात रोडवरील सुखवस्तू घरातील कुटुंबामधील घटना

Aadhaar Seva Kendra Location | आधार यूजर्सला मिळणार आतापर्यंतची सर्वात मोठी सुविधा, UIDAI ने केला ISRO सोबत करार

Pune Pimpri Crime | धक्कादायक ! मुलीला जेवायला दिले नाही म्हणून सासूचा केला खून, सुनेला अटक

 

Related Posts