IMPIMP

Pune Crime | पुण्यातील गंग्या गँगच्या म्होरक्यासह 7 जणांवर मोक्का कारवाई, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 108 वी कारवाई

by nagesh
Pune Crime | MPDA Action On Criminal of Hadapsar CP Amitabh Gupta

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | वाढत्या गुन्हेगारीला लगाम लावण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशान्वये शहरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. वारजे माळवाडी परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे याच्यासह त्याच्या 7 साथीदारावर मोक्का कारवाई केली आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आजपर्यंत 108 आणि चालु वर्षात 45 टोळ्यांवर मोक्का कारवाई (Pune Crime) केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गंग्या उर्फ विकी विष्णू आखाडे (वय-24 रा. सहयोग नगर, वारजे माळवाडी, पुणे) याच्यासह टोळी सदस्य चैतन्य रुक्मीदास ढाले (वय-18 रा. तळजाई माता वसाहत, सुवर्ण मंदिराजवळ, पर्वती, पुणे) आणि फरार असलेल्या 6 आरोपींवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. (Pune Crime)

 

सराईत गुन्हेगार गंग्या उर्फ विकी आखाडे याने त्याच्या 7 साथीदाराच्या मदतीने परिसरात दहशत माजवली होती. आरोपींनी खुनाचा प्रयत्न, दरोडा, नागरिकांच्या मामलत्तेस नुकसान करणे, घातक शस्त्राने जखमी करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे, विनापरवाना शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही. आरोपींनी पुन्हा गुन्हे केले आहेत.

 

गंग्या उर्फ विकी आखाडे व त्याचा साथीदार चैतन्य ढाले याच्यासह फरार असलेल्या सहा आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्याचा प्रस्ताव वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके यांनी पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता.
अपर पोलीस आयुक्तांनी याला मंजुरी दिली आहे.
पुढील तपास कोथरुड विभागाच्या सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे करीत आहेत.
विकी आखाडे आणि चैतन्य ढाले हे सध्या अटकेत असून येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
तर त्यांच्या इतर साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडु हाके,
पोलीस निरीक्षक गुन्हे दत्ताराम बागवे, पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल, पोलीस अंमलदार सचिन कुदळे,
अमोल भिसे, नितीन कातुर्डे, गोविंद कपाटे, महिला पोलीस अंमलदार प्रियांका कोल्हे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Mokka action against 7 people including Gangya gang leader in Pune, Police Commissioner Amitabh Gupta’s 108th action till date

 

हे देखील वाचा :

Taapsee Pannu | तापसी पन्नूचा आगामी चित्रपट होणार ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

FIFA World Cup 2022 | पेलेनंतर स्पेनचा गॅवी ठरला विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण खेळाडू

Maharashtra Karnataka Border Issue | कर्नाटकमधील भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं देवेंद्र फडणवीसांना जाहीर आवाहन, म्हणाले – ‘सोलापूर, अक्कलकोटही…’

 

Related Posts