IMPIMP

Pune Crime | हडपसरमध्ये युवकाविरूध्द विनयभंगाचा गुन्हा

by nagesh
Molestation Case

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | भटक्या कुत्र्यांना खायला घालणार्‍या महिलेला एकाने ‘तू त्याच्याकडून पिल्ले काढुन घे’ असे म्हणत अश्लिल बोलून विनयभंग (Molestation) करण्याचा धक्कादायक प्रकार हडपसरमध्ये ( hadapsar) घडला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) एका युवकाविरूघ्द गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भटक्या कुत्र्यांना खायला घालत होत्या. यावेळी आरोपी तेथे आला. त्याने ‘तू या कुत्र्यांना खायला देऊ नको. मला माहिती आहेत तुझे नखरे, तू धंदा करते, त्यामुळे तुझ्याकडे पैसे येतात. तू त्या कुत्र्यासोबत झोप आणि त्याचेकडून पिल्लु काढून घे’, असे अश्लिल बोलून त्याने फिर्यादी यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले आहे. हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

 

Web Title : pune crime | molestation case against aniket shitole in hadapsar police station

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | हातभट्टी तस्कराकडून पोलीस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न

West Nile Virus | नवीन संकट ! कोरोना दरम्यानच वेस्ट नाईल व्हायरसचा धोका वाढला, जाणून घ्या याची लक्षणे आणि बचावाचे उपाय

Thane Crime | धक्कादायक ! अनिधकृत फेरीवाल्याचा पालिका सहाय्यक आयुक्तांवर चाकूने हल्ला, हाताची 3 बोटं छाटली

 

Related Posts