IMPIMP

Pune Crime | तडीपार गुंडाचा कोयत्याने सपासप वार करुन निर्घुण खून; कोंढव्यातील अशोका म्युज सोसायटीजवळील घटना

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime | तडीपार गुन्हेगाराच्या डोक्यात कोयत्याने वार करुन त्याचा निर्घुण खून (Murder In Kondhwa Pune) करण्यात आला आहे. सुमित ऊर्फ काकासाहेब जाधव (रा. शिवनेरीनगर, कोंढवा) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. सुमित जाधव याला गेल्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (DCP Namrata Patil) यांनी २ वर्षांसाठी पुणे शहर, पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. (Pune Crime)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

त्याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न, दुखापत, गंभीर दुखापत, लोकांना दमदाटी करणे, लुटमार करणे अशा प्रकारचे ८ गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्या प्रतिबंधक कारवाई केल्यानंतरही त्याची गुन्हेगारी सुरुच राहिल्याने त्याला तडीपार करुन अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे सोडण्यात आले होते. तडीपार असला तरी तो पुण्यातच वास्तव्य करुन रहात असल्याचे स्पष्ट झाले. (Pune Crime)

 

याबाबत कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील (Senior Police Inspector Sardar Patil) यांनी सांगितले की, मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सुमित जाधव हा अशोका म्युज सोसायटीजवळून (Ashoka Mews Kondhwa) जात असताना तिघा जणांनी त्याच्यावर कोयत्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांनी याची माहिती मिळाल्यावर त्यांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात (Sasoon Hospital) दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यु झाला. तिघा जणांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

Web Title :- Pune Crime | Murder Of Criminal Who Is On Pune Police Record Near Ashoka Mews Kondhwa

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police Inspector Suicide | पोलीस प्रशिक्षण केंद्रातील पोलीस निरीक्षकाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे प्रचंड खळबळ

Pune Crime | रशियात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची फसवणूक, ओएसिस एज्युकेशनच्या 3 संचालकांविरुद्ध FIR

Afzal Khan Kabar | “ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर अफजल खानाचा…” पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाचें सचिवांना पत्र
Rajan Vichare | ‘मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे’ – खा. राजन विचारे

 

Related Posts