IMPIMP

Afzal Khan Kabar | “ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रतापगडावर अफजल खानाचा…” पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढाचें सचिवांना पत्र

by nagesh
Afzal Khan Kabar | a light sound show will be started by erecting the statue of afzal khan and chhatrapati shivaji maharaj at pratapgad

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   अफजलखानाच्या कबरी (Afzal Khan Kabar) शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या (Forest Department) जागेत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. ते पाडून टाकण्याची मागणी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Organisation) केली होती, तसेच न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांच्या देखरेखीत हे कबरी शेजारील (Afzal Khan Kabar) अनधिकृत बांधकाम पाडण्याचे काम पार पडले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

त्यानंतर आता पर्यटन विभाग प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजल खानाचा (Afzal Khan Kabar) कोथळा काढतानाचा पुतळा आणि लाईट, साऊंड शो सुरू करण्याबाबत विचार करत आहे. पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Londha) यांनी सचिवांना पत्र पाठवून याबाबत प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. या पत्रात मंगलप्रभात लोढा म्हणतात, ‘महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम संपूर्ण विश्वाला परिचित आहे. प्रतापगडावर झालेल्या शिवाजी महाराज आणि अफजल खान भेटीत महाराजांनी वाघनखांद्वारे अफजल खानाचा कोथळा काढून हिंदवी स्वराज्यावर चाल करून आलेल्या शत्रूला धडा शिकवला. याप्रसंगी इतिहासात महत्त्वाची नोंद आहे.’

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

‘तसेच आजही शिवभक्तांना ही घटना प्रेरित करत असते.
यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत.
त्या अनुषंगाने ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ले प्रतापगड येथे छत्रपती शिवाजी महाराज
अफजल खानाचा कोथळा काढतानाचा पुतळा शिवप्रताप स्मारक उभारण्यासाठी तसेच लाईट-साऊंड शो सुरू करण्याबाबत हिंदू एकता आंदोलन,
सातारा व इतर संघटनांकडून विनंती करण्यात आली आहे.
त्यावर संबधित जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तात्काळ प्रस्ताव मागवण्यात यावा.’ अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी ट्विटर द्वारे दिली.

 

Web Title :- Afzal Khan Kabar | a light sound show will be started by erecting the statue of afzal khan and chhatrapati shivaji maharaj at pratapgad

 

हे देखील वाचा :

Rajan Vichare | ‘मुख्यमंत्र्यांच्या मतदार संघात गुंडाराज सुरु आहे’ – खा. राजन विचारे

Mumbai Pune Express Highway | मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी नवीन उपाययोजना, अनेक संस्था एकत्र येऊन करणार काम

Abdul Sattar | अब्दुल सत्तार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचा महिला मोर्चा मंत्रालयावर

Girish Mahajan | ‘जितेंद्र आव्हाड प्रकरण सूर्य प्रकाशाइतके स्वच्छ आहे’ – गिरीश महाजन

 

Related Posts