IMPIMP

Pune Crime | चोरीच्या संशयाने मारहाण करुन तरुणाचा खुन, मंचर पोलिसांकडून 4 जणांना अटक

by nagesh
Maharashtra Crime News | son murdered the father beed crime maharashtra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | किराणा मालाच्या दुकानात चोरी केल्याचा संशयावरुन क्रिकेटची बॅट व कमरेच्या पट्टयाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यु झाला. मंचर पोलिसांनी (Manchar Police) खुनाचा गुन्हा दाखल करुन  चौघांना अटक (Pune Crime) केली आहे. विकी गणपत भोसले (वय २४, रा. पाटीलवाडा, मंचर ता. आंबेगाव) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पोलिसांनी गणेश पांडुरंग बोर्‍हाडे, संतोष सुखदेव जाधव, सार्थक संजय वळसे आणि पिंटु ऊर्फ रवींद्र दौलत थोरात (सर्व रा. मंचर, ता. आंबेगाव) यांना अटक केली  आहे. ही घटना  मंचर येथील मुळेवाडी रोडवर शनिवारी रात्री 8 वाजता घडली.

 

याप्रकरणी मार्तड ऊर्फ योगेश गणपत भोसले (वय 27, रा. पाटीलवाडा, मंचर, ता. आंबेगाव) यांनी मंचर पोलीस ठाण्यात (Manchar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्तंड व विकी भोसले हे भाऊ भाऊ आहेत. ते मुळचे जुन्नर तालुक्यातील हिवरे, भोरवाडी येथील राहणारे असून सध्या मंचरला राहतात. जागरण गोंधळ करणे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. गणेश बोर्‍हाडे याचे जय अंबे किराणा दुकान आहे. या दुकानात विकी भोसले याने जून महिन्यात चोरी केल्याचा गणेश याला संशय होता. तेव्हापासून ते विकीचा शोध घेत होते. 14 ऑगस्ट रोजी रात्री मुळेवाडी रोडवर आरोपींना विकी सापडला. त्यांनी त्याला
शिवीगाळ करुन क्रिकेटच्या बॅट व कमरेच्या पट्ट्याने पायावर, पाठीवर, तोंडावर, डोक्यात जबर
(Pune Crime) मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यु झाला. मंचर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Murder of youth on suspicion of theft, 4 arrested by Manchar police

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुली झाल्याने वंशाच्या दिव्यासाठी केला दुसरा विवाह; हडपसरमध्ये पतीसह 7 जणांवर गुन्हा दाखल

Pune Crime | सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगून ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण, मारहाण करून लुटले; महिलेसह दोघांवर गुन्हा

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 244 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून इतर आकडेवारी

 

Related Posts