IMPIMP

Pune Crime | पुण्यातील धक्कादायक घटना ! शॉर्ट घालून फिरणाऱ्या IT इंजिनिअर तरुणींना शेजाऱ्यांकडून चपलेने मारहाण

by nagesh
Pune Crime News | Stirring ! 22-year-old girl assaulted by leaving marijuana Ganja dust in her nose and mouth in kondhwa Pune rape case crime

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पेईंग गेस्ट (Paying Guest) म्हणून राहणाऱ्या आयटी इंजिनियर (IT Engineer) तरुणी शॉर्ट (Shorts) घालून फिरत असल्याच्या कारणावरुन शेजारी राहणाऱ्या महिलिने तरुणींना चपलेने मारहाण (Beating) केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) एकाच कुटुंबातील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल (FIR Lodged) करण्यात आला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.2) रक्षकनगर (Rakshak Nagar) मध्ये घडला.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्षकनगर परिसरात राहण्यास आहेत. त्यांच्याकडे तीन तरुणी पेईंग गेस्ट म्हणून राहतात. आयटी इंजिनिअर असलेल्या या मुली खराडी (Kharadi) येथील एका खासगी कंपनीत नोकरी करतात. दरम्यान या तरुणी अधून – मधून शॉर्ट घालून घराबाहेर जातात. या मुली शॉर्ट घालतात हे फिर्यादी यांच्या शेजारी राहणाऱ्यांना खटकत होते. याबाबत शेजाऱ्यांनी फिर्यादी यांच्याकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी काय घालावे आणि काय नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचे उत्तर फिर्यादी यांनी शेजाऱ्यांना दिले. (Pune Crime)

 

याच कारणावरुन शेजारी राहणाऱ्या एका 55 वर्षीय महिलेने फिर्यादी यांच्या घरात घुसून वााईट भाषेत शिवीगाळ केली आणि हाताने मारहाण केली.
एवढेच नाही तर शॉर्ट घालून बाहेर जाणाऱ्या मुलींना देखील चपलेने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे (API Sonavane) करत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | neighbors beat up young woman it engineers for walking around the house wearing shorts FIR on 6 in chandan nagar police station

 

हे देखील वाचा :

Magic Drink | वजन कमी करण्यासाठी प्या ‘हे’ मॅजिक ड्रिंक आणि मिळवा अनेक आरोग्य लाभ, जाणून घ्या ‘ते’ कसे बनवतात?

Kidney Care | किडनीमध्ये खराबी झाल्यास शरीरात दिसतात ‘हे’ 5 संकेत, जाणून घ्या कोणते

Make in India ला मिळणार नवीन वेग ! RIL च्या RSBVL चा US कंपनीसोबत करार, जाणून घ्या – कोणती वस्तू देशात बनवणार अंबानींची सहकारी कंपनी

 

Related Posts