IMPIMP

Kidney Care | किडनीमध्ये खराबी झाल्यास शरीरात दिसतात ‘हे’ 5 संकेत, जाणून घ्या कोणते

by nagesh
Pune Kidney Smuggling Case | kidney smuggling racket exposed in pune fraud with a woman by showing a lure of rs 15 lakh koregaon police station

सरकारसत्ता ऑनलाइन – Kidney Care | किडनी (Kidney) हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे जो आपले रक्त शुद्ध (Blood Pure) करतो. शरीरातील विषारी द्रव्ये मूत्राद्वारे बाहेर काढणे हे मूत्रपिंडाचे कार्य आहे. किडनी इलेक्ट्रोलाइट्सची पातळी (Electrolyte Level) नियंत्रित करते. किडनीद्वारेच शरीरात मीठ (Salt), पाणी (Water) आणि खनिजे (Minerals) संतुलित राहतात. किडनीमध्ये (Kidney Care) असलेले लाखो फिल्टर रक्तातील विषारी पदार्थ काढून टाकतात.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

शरीराच्या या महत्त्वाच्या भागाची काळजी न घेतल्यास त्रास वाढू शकतो. किडनीच्या चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैली (Lifestyle) आणि आहारातील बदल (Dietary Changes) आवश्यक आहेत. तेलकट आणि जंक फूडचे (Junk Food) सेवन केल्याने तुमची किडनी फॅटी (Fatty Kidney) होऊ शकते, या प्रकारच्या आहारामुळे किडनीवर सतत अतिरिक्त दबाव पडतो आणि त्यामुळे किडनी निकामी होऊ (Kidney Care) शकते.

 

जेव्हा आपली किडनी नीट काम करत नाही, तेव्हा आपल्या शरीरात त्याची लक्षणे दिसू लागतात. या लक्षणांकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा समस्या वाढू शकते. किडनी निकामी होण्याची लक्षणे कोणती ते जाणून घेवूयात (Symptoms Of Kidney Failure)…

 

1. सतत लघवी होणे (Frequent urination) :
जेव्हा किडनीमध्ये समस्या उद्भवते तेव्हा त्याचा पहिला परिणाम लघवीवर होतो.
सहसा, लघवी दिवसातून 8-10 वेळा येते, परंतु यापेक्षा जास्त लघवी हे किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते.
कधीकधी लघवीत जळजळ आणि रक्तस्त्राव होण्याची समस्या देखील असते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

2. भूक न लागणे आणि वजन कमी होणे (Loss Of Appetite) :
किडनी निकामी झाल्यामुळे, भूक कमी होते आणि रुग्णाचे वजन झपाट्याने कमी (Weight Loss) होते.
या समस्येमुळे रुग्णाला नेहमी पोट भरलेले जाणवते.

 

3. पायांना सूज येणे (Swollen feet) :
किडनी शरीरातील अतिरिक्त सोडियम फिल्टर (Sodium Filter) करण्यास मदत करते.
किडनी निकामी झाल्यामुळे शरीरात सोडियम जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे पायांना सूज येऊ शकते.
या टॉक्सीनचा (Toxin) परिणाम डोळ्यांवर आणि चेहर्‍यावरही दिसून येतो, पण जास्त परिणाम पायांवर होतो.

 

4. त्वचा कोरडी होणे आणि खाज येणे (Dry And Itchy skin) :
जेव्हा किडनी निकामी होते तेव्हा त्याचा परिणाम त्वचेवरही (Skin) दिसू लागतो. त्वचा कोरडी होते आणि त्वचेला खाज येण्याची समस्या देखील होते.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

5. झोप न लागणे आणि अस्वस्थता (Insomnia And Uncomfortable) :
ज्या लोकांना किडनीची समस्या आहे, त्यांची झोपेची पद्धतही बिघडू लागते. झोपेच्या कमतरतेमुळे, कधीकधी अस्वस्थता देखील उद्भवते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Kidney Care | know the early sign and symptoms of kidney failure

 

हे देखील वाचा :

Make in India ला मिळणार नवीन वेग ! RIL च्या RSBVL चा US कंपनीसोबत करार, जाणून घ्या – कोणती वस्तू देशात बनवणार अंबानींची सहकारी कंपनी

Phone Tapping Case | ‘फोन टॅपिंग’ प्रकरणात रश्मी शुक्लांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ आदेश

World Obesity Day | वजन कमी करायचे आहे तर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी, खाल्ल्यास वाढू शकतो लठ्ठपणा

 

Related Posts