IMPIMP

Pune Crime News | फायनान्स कंपनीच्या अधिकृत टोल फ्री क्रमांकावर तरुणाची फसवणूक; नवीन क्रेडीट कार्ड पिन जनरेट करण्यास सांगून लुबाडले साडेसात लाख

by nagesh
Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | मुलीच्या मोबाईलचा रिचार्ज मारण्यासाठी त्यांनी फोन पेवरुन (Phonepe) रिचार्ज करण्याचा
प्रयत्न केला. पण ते होत नसल्याचे त्यांनी बँक खात्याचा बॅलेन्स चेक केला तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपले बँक खाते पूर्ण रिकामे झाले आहे.
बँकेकडून फायनान्स कंपनीचे क्रेडिट कार्ड (Credit Card) आले. ते कार्ड अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी कार्डाबरोबर आलेल्या पत्रावरील संपर्क टोल फ्री
क्रमांकावर संपर्क साधला असता त्यावरील व्यक्तीने पिन जनरेट करण्याचे असल्याचे सांगून एनी डेस्क अ‍ॅपवरुन तब्बल ७ लाख ६८ हजार १९५ रुपये
काढून घेतले. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत ५० वर्षाच्या नागरिकाने सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakarnagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ७८/२३) दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सरोजकुमार जेना आणि धमेंद्र सोनी यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्यावर आर बी एल बँकेचे (RBL Bank) क्रेडिट कार्ड बजाज फिनसर्व (Bajaj Finserv) तर्फे कुरियरने पाकिट मिळाले. त्यात फायनान्स कंपनीचे (Finance Company) क्रेडिट कार्ड व बजाज फिनसर्व कंपनीचा संपर्क टोल फ्री क्रमांक नमूद केला होता. क्रेडिट कार्डचा पिन जनरेट करण्यासाठी त्यांनी त्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी समोरील व्यक्तीने आपण बजाज फिनसर्व बँकेच्या वतीने बोलत असल्याचे सांगितले. त्याने आलेल्या क्रेडिट कार्डचा नंबर, त्याच्या मागील सी वी वी नंबर विचारला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर आलेला एक ओ टी पी नंबर विचारला. त्याने कार्ड अ‍ॅक्टीव्हेट होत नाही असे सांगून पुन्हा दोन वेळा आलेले ओ टी पी त्यांच्याकडून घेतले. त्यावेळी त्यांना दुसरे काम असल्याने त्यांनी तो कॉल कट केला. (Pune Crime News)

 

दुसर्‍या दिवशी त्यांना कॉल आला. त्याने बजाज फिनसर्व बँकींग कंपनीकडून बोलत असल्याचे सांगितले.
कालचे जे पिन अ‍ॅक्टीवेशनचे काम अपूर्ण राहिले आहे. ते काम पूर्ण करुन घेऊ असे सांगितले.
त्यांनी तयारी दर्शविल्यावर त्याने फिर्यादी यांना गुगल अ‍ॅप स्टोरमधून एनी डेस्क अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी केल्यावर अ‍ॅपमध्ये क्रेडिट कार्ड नंबर, बँक खाते नंबर अशी माहिती भरण्यास सांगितले.
त्याप्रमाणे त्यांनी माहिती भरल्यावर त्याने एका नंबरवर २ रुपये पाठविण्यास सांगितले.
परंतु, त्यांनी अशा प्रकारे माहिती नसल्याने व फोन वापरता येत नसल्याने त्यांना त्या अ‍ॅपमधून पैसे पाठविण्यास जमले नाही.
तेव्हा त्या सायबर चोरट्याने एनी डेस्क अ‍ॅपमधून ओटीपी टाकण्यास सांगितले.
त्याप्रमाणे आलेला ओ टीपी चुकीचा आहे, असे सांगून त्याने ६ वेळा ओटीपी त्यांच्याकडून घेतला.
त्यानंतर तुमचे कार्ड अ‍ॅक्टीव्हेट झाले आहे.
तुमचा जन्मसाल वर्ष हाच तुमच्या क्रेडिट कार्डचा पिन असेल, असे सांगून फोन ठेवला.
त्यानंतर त्यांनी सायंकाळी मुलीच्या मोबाईलचा रिचार्ज मारण्यासाठी फोन पे वरुन रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्यांना आपले संपूर्ण बँक खाते रिकामे झाले असून साधे मोबाईल रिचार्ज करण्यासाठीही खात्यात पैसे उरले नसल्याचे लक्षात आले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हा संपूर्ण घटनाक्रम पाहता बजाज फिनसर्व या कंपनीने दिलेल्या संपर्क टोल फ्री हा मुंबईतील आहे.
त्यावरील कर्मचार्‍यानेच फिर्यादींचा क्रमांक सायबर चोरट्यांना दिला. त्यामुळे सायबर चोरट्यांना फिर्यादीची
माहिती मिळाली असून त्यानंतर त्यांनी फसवणूक (Cheating Case) केल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे.
बजाज फिनसर्व कंपनीच्या संपर्क टोल फ्री क्रमांकावरील कर्मचार्‍यानेच सायबर चोरट्यांशी संगनमत करुन
सायबर चोरी केल्याचे दिसून येत आहे. सहकार नगर पोलीस तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime News | Fraud of youth on official toll free number of finance company; 7.5 lakhs cheated by asking to generate a new credit card PIN

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis Bribery Case | ‘देवेंद्र फडणवीस स्वत: गृहमंत्री, चौकशी करुन सत्य जनतेसमोर आणा’ – नाना पटोले

MLA Sunil Tingre | पुणे महापालिकेत समाविष्ट गावांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही ! आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Pune PMC To FDA Administration | एफडीए ने अन्न परवाना नूतनीकरणावेळी व्यावसायीकांना पाणी पुरवठा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र (NOC) बंधनकारक करावे; महापालिका आयुक्तांचे FDA प्रशासनाला पत्र

 

Related Posts