IMPIMP

Pune Crime News | पतीच्या बाहेरख्यालीला विरोध केल्याने विवाहितेचा छळ; महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल तिघांना अटक

by nagesh
Pune Crime News | A young man was stabbed by a coyote due to an argument while playing Rangpanchami; Incident at Balajinagar in Dhankawadi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune Crime News | पतीचे बाहेरील महिलांसोबत असलेल्या प्रेमसंबंधांना (Love Affairs) विरोध केल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या (Suicide In Pune) केली. सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्‍या पती, सासु, सासरे यांना अटक केली आहे. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भिवराज जगन्नाथ तांबे, जगन्नाथ तांबे आणि शेवंता तांबे (रा. तांबेवस्ती, साखरवाडी, सातारा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. कोमल तांबे (वय २२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना धनकवडी येथील मोहननगरमधील विघ्नहर्ता अपार्टमेंटमध्ये (Vighnaharta Apartment, Dhankawadi) २६ डिसेबर रोजी घडली होती. (Pune Crime News)

 

याबाबत दादासो राधु खरात (वय ५२, रा. निंबोडी, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात (Sahakar Nagar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
फिर्यादी यांची मुलगी कोमल हिचा भिवराज तांबे याच्याशी विवाह झाला होता.
लग्नानंतर त्याचे बाहेरील महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती कोमलला मिळाली.
तिने हा प्रकार बंद करायला सांगितला. तेव्हा त्याने कोमला तू शांत रहा़ जास्त कालवा केल्यास वाईट परिणाम
भोगावे लागतील, असे म्हणून धमकी दिली. तिचे सासु, सासरे यांनी कोमल हिला सतत घराचे कामावरुन
मानसिक व शारीरीक त्रास देऊन तू पुण्यात राहायचे नाही. आमच्यासोबत गावी रहायचे बोलून तिला त्रास देऊन
जगणे मुश्किल करुन टाकले होते. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली. सहायक पोलीस निरीक्षक शेंडे
(API Shende) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime News | Harassment of wife for opposing husband’s extra marital affair; Three arrested for inciting woman to commit suicide

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | ‘तुझ मुंडक काढून फुटबॉल खेळतो की नाही बघ’ ! हडपसर परिसरात गुंडाकडून तरुणावर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न

State Bank of India (SBI) | आता व्हॉट्सअ‍ॅपवर मिळेल पेन्शन स्लिप आणि बॅलन्स डिटेल, जाणून घ्या कसे

Pune Crime | प्रियकराने विवाहास नकार दिल्याने 24 वर्षीय गर्भवती तरूणीची आत्महत्या; दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा

 

Related Posts